Sawarkar Jayanti In School : शाळांमध्ये साजरी केली जाणार सावरकर जयंती व कलम ३७० रद्द दिन; 'या' राज्याने घेतला निर्णय

Article 370 Repeal Day | विद्यार्थी या महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेतील, याची राज्य सरकार खात्री करेल.
Sawarkar Jayanti In School
Sawarkar Jayanti In School sakal
Updated on

School Education Department of Rajasthan | राजस्थानच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेत कलम ३७० रद्द करण्याचा दिन तसेच स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव आणला आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० पाच ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले होते. दरम्यान, राजस्थानात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविली होती.

राजस्थानच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ‘शिविरा पंचाग’मध्ये सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी करण्याचे प्रस्तावित आहे. ही शैक्षणिक दिनदर्शिका रविवारी (ता.२८) प्रकाशित करण्यात आली.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा यांनी भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, की केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे. शिक्षणाच्या राजकीयीकरणाला आणि विद्यार्थ्यांवर फुटीरतावादी विचारसरणी लादण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजप प्रवक्ते मुकेश पारीक यांनी मात्र या दिनदर्शिकेचे समर्थन करत काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप केला.

यापूर्वी, राजस्थानच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नऊ जुलै रोजी जारी केलेल्या दिनदर्शिकेत राम मंदिर सोहळ्याचाही समावेश केला होता.

शालेय शिक्षणमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मदन दिलावर यांनी मुघल बादशहा अकबरचे अनावश्यक उद्दात्तीकरण करून स्वातंत्र्यवीर सावरकर व महाराणा प्रताप यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय केल्याची टीका केली होती. सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान चुकीच्या पद्धतीने लिहिले गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीमत्त्वांकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा भाजप सरकारचा हेतू आहे. विद्यार्थी या महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेतील, याची राज्य सरकार खात्री करेल.

- मुकेश पारीक, प्रवक्ते, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.