Savitribai Phule Birth Anniversary : आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. शेणाचे गोळे आणि लोकांची बोलणी खात मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या आणि चूल व मूल ही प्रथा मोडून काढू पाहाणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे. आर्थिकरित्या मागासलेल्या मुलींना आर्थिक पाठबळ पुरवण्याच्या हेतूनं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली होती. आज आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.
इयत्ता ५ वी ते ७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत.
शिष्यवृत्तीसाठीच्या अटी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनाअनुदानित, माध्यमिक शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
कसा कराल अर्ज
दर योजनेचे स्वरूप ऑनलाइन झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी (Savitribai Phule) https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.