Ban On Pakistani Artistes: "इतक्या कोत्या मनाचं असू नये"; पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं फटकारलं!

मुंबई हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानंही ही याचिका फेटाळून लावली आहे.
Pakistani Artists
Pakistani ArtistsEsakal
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम घेण्यावर तसेच सिनेमांमधून काम करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं मंगळवारी फेटाळली. तसेच "माणसानं इतक्या कोत्या मनाचंही असू नये" असं सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला म्हटलं. त्यामुळं पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (SC Dismisses Plea Seeking Ban On Pakistani Artistes To Work In India)

Pakistani Artists
Project Q* : प्रोजेक्ट क्यू स्टार आहे तरी काय? OpanAiच्या सिक्रेट प्रोजेक्टची का होतोय इतकी चर्चा

हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार

फैज अन्वर कुरेशी यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ही याचिका न्या. संजीव खन्ना आणि न्या. एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. खंडपीठानं म्हटलं की, ते मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करु इच्छित नाहीत. (Latest Marathi News)

फैज अन्वर कुरेशी हे एक सिनेकार्यकर्ता आणि कलाकार असल्याचं सांगतात. त्यामुळं कोर्टानं कुरेशी यांना म्हटलं की, "तुम्ही एक कलाकार आहात तर वारंवार अशा प्रकारच्या याचिकांवर जोर देता कामा नये. माणसानं इतकं कोत्या मनाचंही असता कामा नये. तसेच सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यानं हायकोर्टानं केलेल्या काही टिप्पण्या हटवण्याच्या मागणी देखील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. (Marathi Tajya Batmya)

Pakistani Artists
न्यायालयीन कामकाजादरम्यान गुजराती भाषेचा वापर होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

हायकोर्टानं काय केली होती टिप्पणी

यापूर्वी मुंबई हायकोर्टानं पाकिस्तानी कलाकारांना प्रतिबंधित करण्याची मागणी फेटाळून लावली. कोर्टानं देशभक्तीच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं होतं. हायकोर्टानं म्हटलं होतं की, "देशभक्त होण्यासाठी कोणीही परदेशातून विशेषतः शेजारील देशांमधून आलेल्या लोकांप्रती किंवा कलाकारांप्रती शत्रुत्वभाव राखणं गरजेचं नाही" (Latest Marathi News)

Pakistani Artists
Prakash Ambedkar : मी कोर्टाला शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ बाहेर आले नसते ;प्रकाश आंबेडकर

कोणत्या लोकांवर प्रतिबंधाची केली होती मागणी

याचिकेत केंद्र सरकारला हे निर्देश देण्याची मागणी केली की, कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांवर, भारतीय नागरिक, कंपन्या, फर्म आणि असोसिएशनमध्ये कामावर ठेवणे, काम देऊ करणं तसेच त्यांच्या कुठल्याही सेवा घेणं किंवा कोणत्याही संघटनेत प्रवेश करण्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेण्यात यावा, असं म्हटलं होतं. ज्या लोकांवर अशा प्रकारे प्रतिबंधाची मागणी करण्यात आली आहे, त्यात सिनेकलाकार, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. (Entertainment News in Marathi)

Pakistani Artists
Salman Khan : सलमान खाननं केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिल्यांदाच दिसणार 'या' भूमिकेत!

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या खेळण्याचा उल्लेख

मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं आपल्या आदेशात म्हटलं होती की, "कला, संगीत, खेळ, संस्कृती, नृत्य आणि अशा प्रकारच्या घडामोडी आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीयता, संस्कृती आणि राष्ट्र भावनेपेक्षा मोठी आहे.

वास्तवात यामुळं देशांमध्ये शांती, एकता आणि सद्भावना वाढीस लागते. भारतात आयोजित क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये पाकिस्तानची टीम सहभाग घेणार आहे. हे केवळ कलम ५१ अंतर्गत भारत सरकारच्यावतीनं उचलण्यात आलेल्या उल्लेखनीय आणि सकारात्मक पावलांमुळं शक्य झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.