Sanatana Dharma: 'सनातन धर्म' वादाची सुप्रीम कोर्टाकडून दखल; तामिळनाडू सरकार अन् स्टॅलिन यांना पाठवली नोटीस

son joins fathers cabinet in tamil nadu udhayanidhi stalin sworn in as minister for sports politics
son joins fathers cabinet in tamil nadu udhayanidhi stalin sworn in as minister for sports politicssakal
Updated on

नवी दिल्ली : सनातन धर्म वादाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली असून तामिळनाडू सरकार आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस पाठवली आहे. स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळं देशभरात यावरुन मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला होता. (SC issues notice to Tamil Nadu govt and DMK leader Udhayanidhi Stalin for his remarks on Sanatan Dharma)

स्टॅलिन यांनी काय केली होती टिप्पणी

तमिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर सडकून टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "सनात धर्म हा डेंग्यू-मलेरियासाखा आहे. त्याच्यावर उपचार करुन उपयोग नाही त्याला नष्टच केलं पाहिजे. सनातन धर्म हा विषमतावादी धर्म आहे, समाजाला त्याचा उपयोग नाही" स्टॅलिन यांच्या या विधानवरुन मोठा गदारोळ झाला होता.

भाजपची टीका

स्टॅलिन यांच्या या विधानावरुन भाजपनं स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला होता. स्टॅलिन यांचं हे विधान म्हणजे त्यांनी सनात धर्माला मानणाऱ्या हिंदूचा नरसंहार करण्याचं केलेलं आवाहन आहे, अशा शब्दांत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केली होती.

स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतला होता तसेच अनेक हिंदू संघटनांनी निषेध नोंदवला होता. यानंतर मिरा रोड पोलिस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी उदयनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील रहिवासी नागनाथ कांबळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.