SC ST Creamy Layer: अनुसूचित जाती (SC) आणि जमातींमधील (ST) क्रिमीलेअरची ओळख पटविण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणानंतर सत्ताधारी भाजपमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. पक्षाच्या शंभर खासदारांच्या एका शिष्टमंडळाने आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत जाहीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी देखील याची दखल घेत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असून वंचित घटकांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.