शाळांना पुन्हा टाळे; २० डिसेंबर ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत सुटी जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एका आठवड्यातील संसर्गाची ही सर्वाधिक संख्या आहे
school closed
school closedschool closed
Updated on

चंदीगडमधील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांना २० डिसेंबर ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने हिवाळी सुट्टीचे वेळापत्रक बदलून सोमवार २० डिसेंबरपासून शाळा बंद केल्या आहेत. कोरोनाची (coronavirus) वाढती प्रकरणे पाहता चंदीगड शिक्षण विभागाने सर्व शाळा बंद (school closed) करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने (punjab government) ओळखले की मुलांचे संक्रमण होण्याच्या वाढत्या धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाइन अभ्यास काही काळासाठी थांबविला जाईल. पहिली हिवाळी सुट्टी २७ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत असल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.

school closed
प्रियांका चोप्राने ब्लॅक नेट ड्रेसमध्ये केला कहर

मागच्या आठवड्यात चंदीगडमध्ये आढळून आलेली संक्रमणाची १२६ नवीन प्रकरणे जुलैपासून सर्वाधिक आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एका आठवड्यातील संसर्गाची ही सर्वाधिक संख्या आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने शाळांना पुन्हा टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन महिन्यांनी पुन्हा बंद

१८ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. दोन महिने सर्व वर्ग सुरू केल्यानंतर पुन्हा शाळा बंद (school closed) करण्यात येणार आहेत. साथीच्या रोगानंतर प्रथमच शाळा उघडण्यात आल्या. मुलांना पालकांच्या संमतीनेच शाळेत येण्याची परवानगी होती. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यास सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.