तमिळनाडूत पावसाचा हाहाकार, चार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद

chennai rain
chennai raingoogle
Updated on

चेन्नई : तमिळनाडूमधील चेन्नईसह जवळपासच्या परिसराला मुसळधार (Chennai Rain update) पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार जिल्ह्यातील शाळांसह शासकीय कार्यालये पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफच्या (NDRF) पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

chennai rain
जवानाकडून CRPF कॅम्पवर गोळीबार; चार जवानांचा मृत्यू, ३ जखमी

तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. चेन्नईत रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चारजिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक शासकीय कार्यालये आज सोमवारी देखील बंद राहणार आहेत. तसेच खासगी कंपन्यांनी सुट्टी जाहीर करावी अथवा कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.

बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव देखील तुडूंब भरले आहेत. त्यामुळे नद्यामध्ये पाणी सोडल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या नियमित पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही. परंतु जास्त पाऊस पडल्यास मुडूचूरच्या आसपासच्या भागात जलमय होऊ शकते, असे अधिका-यांनी सांगितले. अड्यार नदीच्या काठावर असलेल्या कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात पुराचा इशारा देण्यात आला आहे. तिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तयारीबाबत चर्चा केली आहे आणि एग्मोर, पाडी पूल, पाडी पूल आणि जवाहर नगरसह 14 जलमय भागांना भेट दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मदत कार्यात केंद्राकडून सहकार्य करण्याचे आश्वास दिले आहे. याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.