School Fire : पाटण्यात शाळा पेटविली;शाळकरी मुलाच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांचे पाऊल

बिहारमधील पाटणा येथील दिघा परिसरात एका शाळेमध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे या मुलाच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळाच पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी घडली.
School Fire
School Firesakal
Updated on

पाटणा : बिहारमधील पाटणा येथील दिघा परिसरात एका शाळेमध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे या मुलाच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळाच पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी घडली.

मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार गुरुवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर बराच काळ झाला तरी मुलगा घरी न आल्याने त्‍याच्या पालकांनी शाळेमध्ये चौकशी केली असता शाळा प्रशासनाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्या मुलाच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलाचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र अखेर रात्रीच्या सुमारास त्या मुलाचा मृतदेह शाळेच्या आवारात सापडला.

यामुळे संतापलेल्या मृत मुलाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी संबंधित शाळा पेटवून दिली. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर टायर जाळत रास्तारोको करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकारी कपिल शिरसाट यांनी याप्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला तातडीने अहवाल मागविला आहे.

दरम्यान, या मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, शाळेच्या आवारातील घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले जात आहेत असे, पोलिसांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.