कोरोनाचा (coronavirus) नवीन प्रकार ओमिक्रॉनसह कोरोना पुन्हा पसरायला सुरुवात झाली (schools again closed) आहे. दीर्घ कालावधीनंतर अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यावरून शाळांमध्ये कोरोनाची दहशत परत आल्याचे दिसून येते. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सुमारे शंभर शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.
हिमाचलच्या बिलासपूरमध्ये २३, पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात २९, हरयाणातील अंबालामध्ये चार आणि पंजाबमधील जालंधरमध्ये २५ विद्यार्थ्यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली (schools again closed) आहे. थंडी आणि परीक्षांचा हंगाम दोन्ही असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडू लागली आहे.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील भुलस्वैन गावात बुधवारी एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील देऊळग शाळेतील २३ मुले कोरोना पॉझिटिव्ह (students infected) आढळून आली आहेत.
हिमाचलच्या देलागमध्ये २३ मुलांना लागण
देलग येथील शासकीय हायस्कूलमध्ये ५० मुलांचे कोरोनाचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये २३ मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील आणखी ७० मुलांचे नमुनेही घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण चौधरी म्हणाले की, आता सर्व शाळांमध्ये मुलांच्या कोरोना (coronavirus) चाचण्या केल्या जात आहेत.
बंगालमधील नवोदय विद्यालयातील २९ मुलांना कोरोना
पश्चिम बंगालच्या केंदिया जिल्ह्यात असलेल्या नवोदय विद्यालयात २९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. हे सर्व विद्यार्थी कल्याणी येथील जवाहर नवोदय निवासी शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी आहेत. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसत असल्याने आरोग्य विभागाने त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला आहे.
हरयाणा
हरयाणा जिल्ह्यातील सरसेहरी या शासकीय शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांसह सात जणांना कोरोनाची लागण झाली. यानंतर आरोग्य विभागाने कोरोना बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गमित्रांसह कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांचे नमुनेही घेतले आहेत. ज्याचा अहवाल येणे बाकी आहे. हरयाणा आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोरोना संक्रमित (coronavirus) आढळलेल्या लोकांमध्ये तीन रुग्ण वृद्ध आहेत, ज्यामध्ये दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंजाबमध्ये २५ विद्यार्थ्यांना संसर्ग
पंजाबमध्ये तीन दिवसांत विविध शाळांमधील सुमारे २५ मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. सोमवारी खुर्ला किंगरा सरकारी शाळेतील दोन विद्यार्थी आणि त्यापूर्वी एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. नेहरू गार्डन शाळेतील एका विद्यार्थ्यालाही कोरोना झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात आलेल्या बालकांची संख्या ५० च्या पुढे गेली (students infected) आहे. मात्र, यापैकी २५ शालेय विद्यार्थी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.