३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

राज्यात एकूण ११३ दिवस शाळा बंद राहणार आहेत
Schools closed from 31st December
Schools closed from 31st Decembere sakal
Updated on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार ३१ डिसेंबर ते १४ जानेवारीपर्यंत (Winter holidays announced till January 14) हिवाळी सुट्ट्या जाहीर (Schools closed) करण्यात आल्या आहेत. यूपी व्यतिरिक्त दिल्लीतही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेथे यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. (Schools closed from 31st December)

उत्तर प्रदेशच्या नवीन शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी राज्यात एकूण ११३ दिवस शाळा बंद राहणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांसाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. २१ मे ते ३० जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या असतील. लवकरच उत्तर प्रदेश शिक्षण मंडळ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा (Examination after assembly election) घेण्यात येतील.

Schools closed from 31st December
शरद पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक; म्हणाले...

मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पारा घसरला आहे. तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुरुवारपासून आता ढगाळ वातावरण राहील. सकाळी आणि सायंकाळी धुके राहतील. हलके वारे वाहतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडी वाढणार आहे.

लखनौमध्ये दोन दिवसांत दहा मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ९.६ मिमी आणि बुधवारी ०.४ मिमी पाऊस पडला आहे. पूर्वीच्या काळातही डिसेंबरमध्ये पाऊस पडत होता. पूर्व उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस आणि गडगडाट झाला. बुधवारी, प्रयागराज, लखनौ, बरेली, मुरादाबाद, झाशी, आग्रा येथे दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली. बुधवारी दिवसभरात लखनौचे तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते, असे हवामान विभागाचे संचालक जेपी गुप्ता यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.