Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्‍मीरमध्ये तीन दिवसांत चार दहशतवादी हल्ले! सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहिम सुरू

Jammu-Kashmir Terrorist Attack : दहशतवाद्यांनी मागील तीन दिवसांमध्ये रिआसी, कथुआ, दोडा या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले केले होते.
Jammu-Kashmir Terrorist Attack
Jammu-Kashmir Terrorist Attack
Updated on

जम्मू, ता. १३ (पीटीआय) : जम्मू काश्‍मीरमध्ये तीन दिवसांत चार वेळा दहशतवादी हल्ले आणि चकमकी झाल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून मोठी शोधमोहीम राबविली जात आहे. तपास नाक्यांवर वाहनांची तपासणी सुरू असून संशयितांची चौकशी केली जात आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन संशयितांना अटकही केली आहे.

दहशतवाद्यांनी मागील तीन दिवसांमध्ये रिआसी, कथुआ, दोडा या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झाला, तर एक सीमा सुरक्षा दलाचा एक जवानही हुतात्मा झाला. याशिवाय सात जवान आणि इतर सात जण जखमीही झाले आहेत. जवानांच्या गोळीबारात दोन संशयित दहशतवादीही मारले गेले होते. जवानांनी कथुआमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही हस्तगत केला आहे. या मोठ्या घडामोडींमुळे सुरक्षा दले सावध झाली आहेत.

Jammu-Kashmir Terrorist Attack
Attack in J&k: जम्मू-काश्मीरमध्ये 4 हल्ले करणारे दहशतवादी कसे दिसतात? स्केच जारी; माहिती देणाऱ्याला इतके लाखांचे बक्षीस

लष्कर, निमलष्कर आणि पोलिसांनी दोडा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबविली. याच गावांमध्ये झालेल्या चकमकीत सात जवान जखमी झाले होते. पोलिसांनी चार दहशतवाद्यांची रेखाचित्रेही जारी केली असून त्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास २० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातही पोलिसांनी काही ठिकाणी छापे घातले. कथुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यातील पोलिसांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Jammu-Kashmir Terrorist Attack
GST: निवडणुकीत धक्का बसल्यानंतर मोदी सरकार कराचा बोजा कमी करणार? GST दरात होणार मोठे बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.