H3N2 व्हायरसमुळे दोन मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट, जाणून घ्या लक्षणं...

H3N2 Virus symptoms
H3N2 Virus symptomsesakal
Updated on

H3N2 Virus symptoms: देशामध्ये कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नसतांना आणखी एक धोका देशासमोर उभा राहिले आहे. H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे पहिले दोन बळी गेल्याची माहिती असून त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलं आहे.

एज३एन२ विषाणूची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, यापैकी एक केस हरियाणातील आहे, तर दुसरी केस दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील आहे. या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणं आणि डोळ्यात जळजळ होणं अशी लक्षणं आढळतात.

या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या लोकांची संख्या देशभरात ९० इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला आहे.

H3N2 Virus symptoms
Sharad Pawar : नागालँडमध्ये NCPच्या 7 आमदारांनी विरोध केला होता,पण...; पवारांनी सांगितलं खरं कारण

देशभातल्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. विशेषतः दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. कर्नाटकमध्येदेखील रुग्णसंख्या वाढत आहे. कर्नाटकसह हरियाणा मध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने नियमितपणे हात धुणे, मास्क लावणे आणि स्वच्छतेसंदर्भात आवाहन केलं आहे. या विषाणूच्या संभाव्य धोक्याचा विचार करुन बाधित राज्य आणि केंद्र अलर्ट मोडवर आले आहेत.

H3N2 Virus symptoms
Shyam Benegal : प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर, दोन्ही किडन्या...

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात या विषाणूमुळं एका 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्चला वृद्धाचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वृद्धाला ताप, घसादुखी, अंगदुखी अशा समस्या होत्या. आजारपणामुळं त्यांना 24 फेब्रुवारीला हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांचं 1 मार्चला निधन झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()