Chitradurga : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; महंत शिवमूर्ती शरनारूंनंतर अक्कमहादेवीला अटक

'मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, पण..'
Shivamurthy Sharanaru Arrested
Shivamurthy Sharanaru Arrestedesakal
Updated on
Summary

'मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, पण..'

Shivamurthy Sharanaru Arrested : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील (Chitradurga District) मुरुगा मठाचे (Muruga Rajendra Lingayat Matt) महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू (Shivamurthy Sharanaru) यांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

"संपूर्ण प्रकरणात विहित प्रक्रियेचं पालन केलं जाईल. वैद्यकीय चाचणी व तपासणी प्रक्रिया नियमानुसार होईल. त्यानंतर शिवमूर्ती यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे एडीजीपी आलोक कुमार यांनी दिलीय. दरम्यान, आज या प्रकरणी दुसरी आरोपी अक्कमहादेवी रश्मी हिला अटक करण्यात आलीय. ती मठाची कर्मचारी आहे.

Shivamurthy Sharanaru Arrested
INS Vikrant : 'विक्रांत' केवळ युद्धनौका नाहीय, भारताच्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे : नरेंद्र मोदी

पोलिसांनी महंत आणि इतर चार जणांविरुद्ध पोक्सो (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आलीय. शरनारू हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Shivamurthy Sharanaru Arrested
शिक्षक दिनी शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचं पूजन करा; भाजप आमदाराचं सरपंच-सदस्यांना आवाहन

मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, गुरुवारी चित्रदुर्गाच्या न्यायालयानं (Chitradurga Court) सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. यापूर्वीही त्यांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी शिवमूर्तींसह वसतिगृह प्रमुख परशिवैय्या बसवदित्य, मठ कर्मचारी अक्कमहादेवी रश्मी आणि वकील गंगाधरैया यांच्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()