लसीकरणाला वेग मिळणार, 'स्पुटनिक-व्ही'ची दुसरी खेप दाखल

लसीकरणाला वेग मिळणार, 'स्पुटनिक-व्ही'ची दुसरी खेप दाखल
Updated on

रशियाच्या (Russia) 'स्पुटनिक-व्ही' ( Sputnik V ) कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी खेप शनिवारी भारतात दाखल झाली. रशियावरुन विमानानं हैदराबाद विमानतळावर लस दाखल झाली. १ मे रोजी 'स्पुटनिक-व्ही' लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली होती. लॅब चाचणीनंतर भारतामध्ये याच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होणार आहे. आज, शनिवारी 'स्पुटनिक-व्ही' ( Sputnik V ) लसीची दुसरी खेप भारतामध्ये दाखल झाली आहे. देशात लसीकरणाचा तिसरा आणि महत्वपूर्ण टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात आता भारतीयांना स्पुटनिक लसही उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे. (Second consignment of Sputnik V arrives in Hyderabad)

रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेफ एक मे 2021 रोजी भारतात दाखल झाली होती. हिमाचल प्रदेशमधील (Himachal) कसौलीतील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीत या लसीच्या चाचण्या घेतल्यानंतर सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. लॅबला स्पुटनिक लशीचे 100 नमुने पाठवण्यात आले होते. लशीची कार्यक्षमता, प्रभाव आणि त्याचे दुष्परिणाम या निकषांवर चाचणी घेण्यात आली.

भारतातील किंमत -

रशियाच्या 'स्पुटनिक V' (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. लशींच्या किंमतीवर 5 टक्के जीएसटी लागू असेल. लशींची निर्मिती भारतात होऊ लागल्यास याची किंमत आणखी कमी होईल.

लसीकरणाला वेग मिळणार, 'स्पुटनिक-व्ही'ची दुसरी खेप दाखल
कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक V; असा आहे 3 लशींमध्ये फरक

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोहिमही जोरात सुरु आहे. कोरोनाचा हा कहर नियंत्रणात यावा यासाठी जास्तीत जास्त वेगानं लसीकरण होणं गरजेचं आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना लस दिली गेल्यास संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते. याच कारणामुळे भारतानं गेल्या महिन्यांत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारतात लसीकरणासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन नंतर आता स्पुटनिक-व्ही लसींचे डोस भारतीयांना उपलब्ध होणार आहेत. स्पुटनिक लस ही ९० टक्के प्रभावी असल्याचं चाचणीतील निष्कर्ष आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.