उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (ghaziabad) जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या वृद्धाला कोरोनाचा (coronavirus) दुसरा डोस (vaccine) कथितपणे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या या कृतीमुळे मृताच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. या घटनेमागे मोठी फसवणूक झाल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. किशनपाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (second corona vaccine was given to the died man)
प्राप्त माहितीनुसार, २१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १.३७ वाजता किशनपालच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर मेसेज आला. या मेसेचमध्ये किशनपाल यांना कोरोनाचा (coronavirus) दुसरा डोस दिल्याचे सांगितले गेले होते. मात्र, किशनपाल यांचे गेल्यावर्षीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६ मे २०२१ रोजी मृत्यू झाला होता. किशनपाल यांना ६ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाचा पहिला डोस (vaccine) दिला होता. त्यानंतर एका महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने मृत लोकांना लस देण्यास सुरुवात केली आहे, असे मृत किशनपालच्या कुटुंबीयांनी म्हटले. माझे मित्र किशनपाल यांचे ६ मे २०२१ रोजी निधन झाले आणि २१ जानेवारी २०२२ रोजी त्यांचे लसीकरण गाझियाबादच्या डॉक्टरांनी केले. यामागे फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी आरोग्य राज्यमंत्री, गाझियाबादचे (ghaziabad) आरोग्य विभाग, जिल्हा दंडाधिकारी आणि गाझियाबादचे सीएमओ यांना या घटनेकडे लक्ष वेधून चौकशीचे आवाहन केले आहे. डॉक्टरांना विचारले पाहिजे की ही लस (vaccine) कुठे फेकली किंवा कोणाला विकली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.