Atiq Ahmed Murder : गँगस्टर अतिक-अशरफच्या हत्येनंतर संपूर्ण यूपीत कलम 144 लागू; पोलीस अलर्ट मोडवर

आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली.
Atiq Ahmed Murder
Atiq Ahmed Murderesakal
Updated on
Summary

हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचं निलंबन केलं आहे.

Atiq Ahmed Murder : उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal Murder Case) आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली.

दोघांचीही वैद्यकीय चाचणी करायची होती, त्यासाठी त्यांना प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये (Prayagraj Medical College) आणण्यात आलं होतं. या दोघा भावांना मेडिकल कॉलेजच्या इथं आणलं, तेव्हा दबा धरून बसलेल्या तिघांनी या दोन्ही भावांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केलीये.

Atiq Ahmed Murder
Sudan Army : सुदानमधील हिंसक संघर्षात 47 ठार तर 380 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

यानंतर संपूर्ण यूपीत कलम 144 लागू करण्यात आलंय. प्रयागराजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं इंटरनेट सेवा देखील बंद केली आहे. ज्या प्रयागराज जिल्ह्यात ही हत्या झाली, तिथं हाय अलर्ट असून रॅपिड अॅक्शन फोर्ससह (RAF) अतिरिक्त फौजा जवळपासच्या जिल्ह्यांत तैनात करण्यात आल्या आहेत.

Atiq Ahmed Murder
Atiq Ahmad Murder : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर ओवैसींचा संताप; म्हणाले, तुम्ही गिधाडं आहात, मृतदेह खा..

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचं निलंबन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.