G-20 Summit in Delhi: फुटबॉलची २६ स्टेडिअम्स मावतील एवढा भव्य आहे भारत मंडपम; जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

भारत मंडपमचे एकूण बजेट सुमारे २,७०० कोटी रुपये आहे. इथे बांधण्यात आलेल्या समिट हॉलसाठी झेक प्रजासत्ताकातून एक मोठा झुंबर खास खरेदी करण्यात आला आहे.
Bharat Mandapam for G20 Summit in Delhi
Bharat Mandapam for G20 Summit in DelhiSakal
Updated on

दिल्लीत होणारी जी-२० शिखर बैठक भारत मंडपम इथे होणार आहे. हे Rcop असोसिएट्सने सिंगापूरस्थित कंपनी एडासच्या सहकार्याने बनवलं आहे. भारत मंडपम इतका मोठा आहे की त्यात २६ फुटबॉल स्टेडियम आरामात सामावून घेऊ शकतात. या भारत मंडपमची वैशिष्ट्ये जाणून घ्या...

भारत मंडपमचं एकूण बजेट सुमारे २,७०० कोटी रुपये आहे. इथे बांधण्यात आलेल्या समिट हॉलसाठी झेक प्रजासत्ताकातून एक मोठा झुंबर खास खरेदी करण्यात आला आहे. भारत मंडपमचा आकार इतका मोठा आहे की त्यात २६ फुटबॉल स्टेडिअम आरामात सामावू शकतात. हे भारतातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर देखील आहे. (News about G20 Summit in New Delhi 2023)

Bharat Mandapam for G20 Summit in Delhi
G-20 Summit in Delhi: कोण आहेत भारताचे शेरपा? कोणाकडे असते ही जबाबदारी आणि यांचं काम काय असतं?

भारत मंडपम हे नाव भगवान बसवेश्वरांच्या 'अनुभव मंडपम' वरून प्रेरित आहे. अनुभव मंडपम म्हणजे वादविवाद आणि अभिव्यक्तीची लोकशाही पद्धत.भारत मंडपमची रचना Rcop असोसिएट्सचे आर्किटेक्ट संजय सिंग यांनी सिंगापूरस्थित फर्म एडासच्या सहकार्याने केली आहे. हे भारतीय परंपरेशी निगडित आधुनिक केंद्र आहे. भारत मंडपमचं एकूण क्षेत्रफळ १२३ एकर म्हणजे सुमारे ४० लाख चौरस फूट आहे. त्याचं बांधकाम ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू झालं. २६ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन केलं.

Bharat Mandapam for G20 Summit in Delhi
G-20 Summit in Delhi: इंदिरा गांधींच्या काळातही दिल्ली संमेलनासाठी सजली होती; पहिल्याच दिवशी मोठे नेते झाले नाराज

भारत मंडपममध्ये एकावेळी १३,००० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. इथे एक हलवता येण्याजोगी भिंत देखील आहे, ती काढून ७ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. भारतमंडप हे शंखाच्या आकारात बांधलं आहे. त्याच्या भिंतींवर भारतीय कला-संस्कृतीची झलक दिसते. इथे भिंतींवर तंजोर चित्रकला आणि मधुबनी कला दिसते.

Bharat Mandapam for G20 Summit in Delhi
G-20 Summit in Delhi: चांदीची १५ हजार भांडी, सोन्याची ताटवाटी..; जी-२० परिषदेच्या पाहुण्यांसाठी राजधानीमध्ये शाही व्यवस्था

भारत मंडपममध्ये १.८ दशलक्ष चौरस फुटांचं तळघर आहे. तसंच, प्रदर्शनाचं क्षेत्र १६ लाख चौरस फुटांमध्ये आहे. याशिवाय फूड हॉल, मीटिंग रूम आणि अॅडमिन एरिया देखील आहे.भारत मंडपममध्ये ५,००० वाहने पार्क करता येतील. इथे १२ प्रदर्शन हॉल आहेत. इथं दीड एकरात तलाव तयार करण्यात आला आहे. भारत मंडपमच्या शीर्षस्थानी 'विंडो टू दिल्ली' बनवण्यात आली आहे. इथून कर्तव्यपथ, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दिसतं. तीन मजल्यांवर बांधलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक व्हीव्हीआयपी खोल्या आहेत.

जी-२० शिखर परिषदेनंतर भारत मंडपम सर्वसामान्यांसाठी खुला केला जाऊ शकतो. गणेश चतुर्थीपासून ते लोकांसाठी खुलं केलं जाऊ शकतं, असं मानलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()