Seema Haider Vs Prasanjit : सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याची तयारी मात्र प्रसनजीत भारतात कधी येणार?

Seema Haider Vs Prasanjit
Seema Haider Vs PrasanjitSakal
Updated on

भारतात सध्या दोन नावांची चर्चा आहे. आधी पाकिस्तानातून भारतात पोहोचलेली सीमा हैदर तिच्या प्रेमकथेमुळे चर्चेत आहे. तिने भारतीय मुलगा सचिन मीनाशी लग्न केल्याचा दावा केला.

बेकायदेशीरपणे भारतात आल्यावर तिला अटक करण्यात आली पण तिला न्यायालयाने जामीन दिला. ती बिनदिक्कतपणे प्रसारमाध्यमांना मुलाखती देत आहे आणि कोणत्याही बंधनाशिवाय आपल्या मुलांसह सचिन मीनासोबत राहत आहे.

दुसरं प्रकरण मध्यप्रदेशातील बालाघाट येथील प्रसन्नजीतचं असून ते सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. रडून रडून त्यांच्या नातेवाइकांची दुरवस्था झाली आहे.

Seema Haider Vs Prasanjit
Irshalwadi Landslide : रेनकोट घालून पाऊलवाटेने दीड तासाची पायपीट करत मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल | Video Viral

5 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रसन्नजीतची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करावी, अशी विनंती नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनामार्फत भारत सरकारकडे केली आहे. आई-वडील वृद्ध झाले असून त्यांना आधाराची गरज आहे. प्रसन्नजीत आणि सीमा हैदरच्या दोन्ही केसेसमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.

बेकायदेशीरपणे देशात आलेली सीमा कोणतीही भीती न बाळगता बोलत आहे आणि तिला पाकिस्तानात पाठवण्याची तयारी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला प्रसन्नजीतची बहीण आपल्या भावाच्या सुटकेसाठी लढत आहे.

बेपत्ता प्रसन्नजीत कसा सापडला?

प्रसन्नजीत 5 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. बहिण संघमित्रा सांगतात, तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. याची माहिती कुटुंबीयांना जम्मू-काश्मीरच्या कुलजीत सिंग यांच्याकडून मिळाली. 20 वर्षांचा तुरुंगवास भोगून पाकिस्तान तुरुंगातून परतल्यावर त्यांनी फोनद्वारे प्रसन्नजीतच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांना मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

एप्रिल 2022 मध्ये कुटुंबीयांना ही बातमी मिळाली. यानंतर कुटुंबीयांनी प्रशासनामार्फत भारत सरकारला हा प्रकार सांगण्यास सुरुवात केली आणि सुटकेसाठी मदतीची विनंती केली. प्रसन्नजीत पाकिस्तानात कसा पोहोचला, ही माहिती आजतागायत स्पष्टपणे समोर आलेली नाही, मात्र प्रसन्नजीत पाकिस्तानच्याच तुरुंगात असल्याची खात्री कुलजित सिंगच्या माध्यमातून निश्चित झाली आहे.

Seema Haider Vs Prasanjit
Khalapur Irshalwadi Landslide : "भावजय गेली, लेकरं गेली, आता कुणी नाही राहिलं रं बाबा..." नातेवाईकांचा टाहो

मात्र, प्रसन्नजीत यांना लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. कारागृहाच्या ब्लॉक-4 मध्ये ते बंद आहेत. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप आहे. प्रसन्नजीतला तुरुंगात मुलासारखी वागणूक दिल्याचे कुलजीत सिंग सांगतात.

कुलजीत सिंह यांनी मीडियाला सांगितले की, प्रसन्नजीतला ऑक्टोबर 2019 रोजी तुरुंगात आणण्यात आले होते. कुलजीत हे प्रसन्नजीतच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहेत.

सीमा हैदरचा प्रश्न

सीमा हैदरची अनेकवेळा चौकशी करण्यात आली. एटीएसच्या चौकशीदरम्यान ती दिल्ली-एनसीआरमधील अशा अनेक मुलांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. सीमा हैदरबाबत जी माहिती समोर आली आहे, त्यामुळे संशयाची व्याप्ती वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()