सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीबद्दल आता संपूर्ण देशाला माहिती मिळालेली आहे. पाकिस्तानातून आपल्या प्रेमासाठी भारतात आलेली सीमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या प्रेमासोबतच त्या दोघांची आर्थिक परिस्थितीही चर्चेचा विषय ठरत आहे. सचिन आणि सीमाच्या घरातल्यांना बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आल्याने त्यांच्या पोटापाण्याचे अक्षरशः हाल होत आहेत.
त्यांच्या घरची आर्थिक स्थिती खालावली आहे. ही बातमी व्हायरल होताच, उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला मदतीचा हात दिला आहे. अमित यांनी आपली चित्रपट निर्मिती संस्था जानी फायर फॉक्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या एका चित्रपटात या दोघांनाही अभिनयाची ऑफर दिली आहे.
अमित जानी यांनी नुकतीच मुंबईत एक फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली आहे. जानी फायर फॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. उदयपूरमध्ये झालेल्या टेलर कन्हैय्या लाल साहू हत्याकांडावर अमित चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचं नाव 'ए टेलर मर्डर स्टोरी' असं आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Trending News)
अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. त्या बदल्यात अमित या जोडप्याला पैसे देतील. अमित जानी यांनी आपल्या बाजूने व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणतात की सीमा ज्या पद्धतीने भारतात आली आहे, त्याचं समर्थन आपण करत नाही. अमित यांनी सीमाच्या कृत्याचा विरोधही केला होता. पण आता माध्यमांमधून माहिती मिळाली की सीमाच्या घरी पोटापाण्याचे हाल होत आहे, तेव्हा भारतीय असल्याच्या नात्याने त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळेच आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमचं प्रोडक्शन हाऊस असलेल्या जानी फायर फॉक्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटामध्ये ती अभिनय करू शकते. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. आणि आम्ही सीमाला कामाचा मोबदलाही देऊ, ज्यामुळे तिची मदत होईल, असं अमित जानी यांनी स्पष्ट केलं आहे.
याबद्दल अमित जानी यांनी आजतकशी संवाद साधला आहे. फोनवर अमित यांनी सांगितलं की दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या द्वारे सीमा हैदरच्या घरी मेसेज पोहोचला आहे की जर तिला चित्रपटात काम करायचं असेल तर ती करू शकते. सीमाने यावर 'विचार करून सांगते' असं उत्तर दिलं आहे, पण अजून तिच्याकडून काही प्रतिसाद आलेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.