Seema Haider: सीमा हैदरकडून 4 मोबाईल, 5 पासपोर्ट जप्त; यूपी पोलिसांची मोठी कारवाई

यूपी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Seema Haider Pakistan
Seema Haider PakistanSakal
Updated on

लखनऊ : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात दाखल झालेल्या सीमा हैदर या महिलेची आज उत्तर प्रदेश पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान, तिच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन्ससह अनेक पासपोर्ट आणि इतर गोष्टी जप्त केल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती युपी पोलिसांनी प्रेसनोटच्या माध्यमातून दिली आहे. (Seema Haider UP Police seized 4 mobile phones 5 passports from her)

पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा हैदरकडे दोन व्हिडिओ कॅसेट जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ४ मोबाईल फोन, ५ पाकिस्तानचे अधिकृत पासपोर्ट तसेच एक बिगर नावाचा पासपोर्टही आढळून आला आहे. (Latest Marathi News)

हा पासपोर्ट तिच्याकडं कसा आला? याचा तपास केला जात आहे. सीमा हैदर आपल्या चार मुलांसह अवैधरित्या भारतात दाखल झाल्यानं खळबळ उडाली होती. ती नेमकी कशी दाखल झाली याचा तपासही यूपी पोलिसांकडून केला जात आहे, अशी माहिती पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Seema Haider Pakistan
Mumbai Rain: लोकलसाठी रेल्वे स्थानकात तुफान गर्दी! मुख्यमंत्र्यांनी बेस्ट, एसटीला दिले 'हे' आदेश

पब्जी खेळताना झाली ओळख

उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला सचिन मीणा आणि पाकिस्तानी महिला सीमा गुलाम हैदर हे ऑनलाईन गेम पब्जी खेळताना सन २०२० मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. सुमारे १५ दिवस हा गेम खेळल्यानंतर त्यांनी एकमेकांना व्हॉट्सअॅप नंबर शेअर केले, त्यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क सुरु झाला आणि त्यांच्यामध्ये प्रेम जडलं. सीमा हैदर हिला चाल मुलं आहेत.

तिचा पती २०१९ मध्ये कामानिमित्त सौदी अरेबियात राहतो, तिथून तो सीमाला घरखर्चासाठी पैसे पाठवतो. पण सीमाला सचिनकडं भारतात यायचं असल्यानं तिनं आपल्याकडं जमा झालेले पैसे आणि राहतं घर विकून १२ लाख रुपये जमा केले.

Seema Haider Pakistan
Uddhav Thackeray meet Ajit Pawar : ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला! उद्धव म्हणाले, जनतेला न्याय मिळेल कारण…

भारतात असा झाला प्रवेश

त्यानंतर सीमा आणि सचिन पहिल्यांदा नेपाळमध्ये टुरिस्ट व्हिजावर पोहोचले इथं ते एका हॉटेलमध्ये थांबले. सीमानं कराची मार्गे शारजाह आणि नंतर काठमांडू असा प्रवास केला. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा कराची-दुबई-काठमांडू असा प्रवास केला. यावेळी नेपाळच्या काठमांडूहून उत्तर प्रदेशच्या बॉर्डरनं युपीत प्रवेश केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.