Seema Haider : धर्म बदलल्यानंतर पाकिस्तानी सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळेल का, कायदा काय सांगतो?

27 वर्षीय सीमा आपल्या चार मुलांसह त्याला भेटण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात आली
Seema Haider
Seema Haideresakal
Updated on

Seema Haider : पाकिस्तानची सीमा गुलाम हैदर PUBG च्या माध्यमातून नोएडाच्या सचिनच्या प्रेमात पडली. 27 वर्षीय सीमा आपल्या चार मुलांसह त्याला भेटण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात आली. तिने मुलांची नावं बदलली आणि आता ती धर्म बदलण्याच्या तयारीत आहे. भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल तिच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती. यात जामीन मिळाल्यानंतर ती आता नोएडा मधील सचिनच्या घरी राहत आहे.

Seema Haider
Pune : शाळेत पोलीस काका! रोड रोमिओ व टवाळखोर यांच्याकडून त्रास होऊ नये यासाठी पोलीस काकांची नियुक्ती

सीमा हैदरच्या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जसं की ती भारतात राहू शकते की नाही? पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांना नागरिकत्व देण्याबाबत कायदा काय म्हणतो? जर तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला तर नियम शिथिल होतील का आणि तिच्या बाबतीत काय होऊ शकतं?

सीमा हैदर भारतात राहू शकते की नाही?

भारतात प्रवेश घेण्यासाठी अनेक नियम आहेत. पासपोर्ट कायदा 1920 नुसार, त्या व्यक्तीकडे पासपोर्ट असणं आवश्यक आहे. व्हिसा असणं आवश्यक आहे. भारतात राहण्याची परवानगी असली पाहिजे. फॉरेनर्स ऍक्ट 1946 नुसार, जर परदेशी लोक भारतात आले तर ते व्हिसाच्या कालावधीपर्यंतच येथे राहू शकतात. याशिवाय संबंधित विविध कार्यालयांमध्ये त्यांना एंट्री करावी लागते.

Seema Haider
Pune Crime : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून तरुणाला अटक

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष पांडे सांगतात की, या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्यांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. अशा प्रकारे त्या अवैध स्थलांतरित आहेत. जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केला, तर कायदा म्हणतो की त्याला निर्वासित केलं जाईल. म्हणजेच तो ज्या देशातून आला होता त्या देशात त्याला परत पाठवलं जाईल.

Seema Haider
Pune News : पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल…

फॉरेनर्स ऍक्ट म्हणतो की, असे लोक जे बेकायदेशीरपणे भारतात येतात किंवा व्हिसाचा निर्धारित कालावधी संपल्यानंतरही येथेच राहतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. त्यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकतो. सीमा हैदरच्या प्रकरणी याबाबत एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. आता तिला जामीन मिळाला असून आता हा खटला सुरू आहे.

Seema Haider
Pune Fire News : पुण्यात येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग! अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

या प्रकरणात तिचा गुन्हाही सिद्ध होईल कारण तिने स्वत: बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचं कबुल केलं आहे. भारतात प्रवेश करण्याची ही पद्धत बेकायदेशीर आहे हे मला माहीत नव्हतं असं तिचं म्हणणं आहे. या प्रकरणात तिला हद्दपार केलं जाऊ शकतं. तसं झालं नाही तर तिला अटक होऊ शकते.

Seema Haider
Healthy Heart Tips :  या लाल फळाशी कराल गट्टी, तर होईल Heart Attack ची सुट्टी!

सीमाला भारतीय नागरिकत्व मिळेल का?

अधिवक्ता आशिष पांडे म्हणतात, भारतात नागरिकत्व मिळवण्याचे काही मार्ग आहेत. उदाहरणार्थ, ज्या वेळी राज्यघटना लागू झाली, त्या वेळी जो कोणी भारतात होता, त्याला नागरिकत्व मिळाले. जर तुमचा जन्म भारतात झाला असेल तर तुम्हाला इथले नागरिकत्व मिळते.

तिसरा मार्ग म्हणजे नोंदणी. उदाहरणार्थ, इथल्या मुलाने दुसऱ्या देशातील मुलीशी लग्न केले किंवा परदेशी मुलीने भारतीय मुलाशी लग्न केले, तर ती भारतातील नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते.

Seema Haider
Health Tips : पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येतोय? ६ सोप्या घरगुती टिप्स!

चौथा मार्ग- तुम्ही भारतात 11 ते 15 वर्षे राहत असलात तरीही तुम्ही नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. या प्रकरणांमध्ये, तुमचा भारतात प्रवेश बेकायदेशीर नसेल तरच नागरिकत्व मिळेल.

पाचवा मार्ग- नागरिक सुधारणा कायदा (CAA) सांगतो की जर तुम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि शेजारील देशात अल्पसंख्याक (धार्मिक अल्पसंख्याक) म्हणून राहत असाल आणि धर्मासाठी छळ होत असेल आणि भारतात 31 डिसेंबर 2014 पर्यंत तुम्ही आला असाल तर तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. त्या देशांत अल्पसंख्याक असणे ही सर्वात मोठी अट होती. सीमा हैदरचे प्रकरण भारतातील नागरिकत्वाच्या कोणत्याही प्रमाणात बसत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीच्या आधारे नागरिकत्व देता येणार नाही.

Seema Haider
Health : बाळंतपणानंतर मानसिक विकारांचे प्रमाण वाढले, पोस्टपार्टम डिप्रेशनचा प्रकार; सौम्य औषधोपचार, समुपदेशनानंतर जगणे सुसह्य

धर्म बदलल्यास सीमा हैदरला दिलासा मिळेल का?

सीमा हैदरने धर्म बदलला तर तिला नागरिकत्व मिळेल का? या प्रश्नाला उत्तर देताना अधिवक्ता आशिष पांडे म्हणतात, धर्म बदलूनही त्यांना दिलासा मिळणार नाही कारण ही बाब 2014 नंतरची आहे. दुसर म्हणजे, शेजारच्या देशातही त्या अल्पसंख्याक राहिलेल्या नाहीत.

Seema Haider
Monsoon Tips पावसात गाडी स्टार्ट होत नाही...नका घेऊ टेन्शन....

देशात अनेकदा असे प्रकार घडतात की जेव्हा एखाद्या भारतीयाने पाकिस्तानमध्ये लग्न केले किंवा तिथल्या व्यक्तीने भारतात लग्न केले, तेव्हा त्यांना एकमेकांच्या देशाचे नागरिकत्व मिळते, परंतु सीमा हैदरच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे.

Seema Haider
Car Maintenance Tips : पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? मनस्ताप टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स

सीमा हैदरला नागरिकत्व कसे मिळणार?

सीमा हैदर यांना यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. जर तिने कोर्टात माफी मागितली आणि ती मान्य झाली तर भारत सरकार तिला हद्दपार करेल. यानंतर त्यांना भारतात येण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल.

Seema Haider
Car Maintenance Tips : पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? मनस्ताप टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स

जर तिला भारतीय पुरुषाशी लग्न करायचे असेल तर आधी तिला तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यावा लागेल. यानंतर तिला भारतीय पुरुषाशी लग्न करावं लागेल. त्यानंतर तिला भारतातील नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागेल. जर तिने कायदेशीररित्या भारतीय व्यक्तीशी लग्न केलं तर तिला नागरिकत्व मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.