लेडी कॉन्स्टेबल सोबत हॉटेलमध्ये सापडले DY एसपी, पदावनती करून बनवलं हवालदार, काय आहे नियम ?

उत्तर प्रदेशमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची थेट शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे.
senior UP Police officer demoted to constable
senior UP Police officer demoted to constable
Updated on

सरकारी कार्यालयांमध्ये असे काही कर्मचारी असतात जे सुरवातीला क्लार्क असतात पण हळुहळू त्यांना बढती मिळते आणि ते मोठ्या पदांपर्यंत मजल मारतात. पण काही अपवाद घटना घडत असतात, उत्तर प्रदेशमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची थेट शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची पदावनत करण्यात आले आहे. त्यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदावरून हवालदार बनवण्यात आले आहे. कृपा शंकर कनौजिया असं या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे.

तीन वर्षांपूर्वी ते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर एका हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते आणि त्यांची इन्स्पेक्टर पदावरही पदावनती करण्यात आली.

senior UP Police officer demoted to constable
Lok Sabha Session 2024: बंगला, गाडी, मोफत प्रवास, मोफत टोल! जाणून घ्या आजपासून 280 नव्या खासदारांना कोणकोणत्या सुविधा मिळणार?

त्यानंतर विभागीय चौकशीत कृपाशंकर दोषी आढळल्यावर हवालदार पदावर पाठवण्याचे आदेश सरकारने डीजीपी मुख्यालयाला दिले. शनिवारी,अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्या सूचनेनुसार, त्यांना गोरखपूरच्या 26 व्या कॉर्प्समध्ये परत हवालदार बनवण्यात आले.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

देवरिया जिल्ह्यातील रहिवासी कृपा शंकर कन्नौजिया 1986 मध्ये यूपी पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. विभागीय परीक्षा देऊन ते हेड कॉन्स्टेबल आणि नंतर सब इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचले. यानंतर, वेळेनुसार, त्यांना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आणि 26 व्या कॉर्प्स पीएसीमध्ये नियुक्त करण्यात आले. यानंतर कृपाशंकर यांना सर्कल ऑफिसर या पदावर बढती देऊन उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर येथे नियुक्त करण्यात आले.

६ जुलै २०२१ मध्ये कृपा शंकर कनौजिया हे उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांनी घरी जाण्यासाठी वरिष्ठांकडे सुट्टीचा अर्ज केला होता. वरिष्ठांनी त्यांची सुट्टीदेखील मंजूर केली. मात्र, ते उन्नावमधून थेट घरी न जाता कानपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचले.

हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांनी त्यांचा खासगी आणि सरकारी फोन बंद करून ठेवला होता. यादरम्यान, त्यांच्या पत्नींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने यांची माहिती उन्नावच्या पोलीस अधिक्षकांना दिली.

senior UP Police officer demoted to constable
Nitin Gadkari: मोदी 3.0 मध्ये गडकरींचा ठरला रोडमॅप! तब्बल 30,000 किलोमीटरची आखली योजना

उन्नाव पोलिसांनी जेव्हा कृपा शंकर कनौजिया यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये दिसून आले. त्यानंतर उन्नाव पोलिसांनी थेट संबंधित हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली, त्यावेळी कृपा शंकर कनौजिया हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.

सीओ कृपा शंकर आणि महिला कॉन्स्टेबल हॉटेलमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

या घटनेनंतर उन्नाव पोलिसांनी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर सरकारने तीन वर्षांनंतर त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावरून पोलीस शिपाई पदावर पदानवत करण्याची शिफारस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.