सीरम करणार स्पुटनिकची निर्मिती; DCGI कडे मागितली परवानगी

covid 19, covid 19 vaccine,  serum institute, clinical trial
covid 19, covid 19 vaccine, serum institute, clinical trial
Updated on

नवी दिल्ली - कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट आता रशियाची स्पुटनिक व्ही लसही तयार करू शकते. सध्या सीरम इन्स्टिट्यूट कोविशील्ड लस तयार करते. सीरमने स्पुटनिक व्ही लशीच्या निर्मितीसाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. सीरमचे टेस्ट अॅनालिसिस आणि परीक्षण मंजुरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीची निर्मिती डॉक्टर रेड्डीज लॅबकडून केली जात आहे. दरम्यान, सीरमने बुधवारी डीसीजीआयला एक अर्ज केला आहे. यामध्ये भारतात कोविड 19 लस स्पुटनिकच्या निर्मितसाठी परवानगी मागितली आहे.

covid 19, covid 19 vaccine,  serum institute, clinical trial
महिलेच्या विवाहबाह्य संबंधामुळे मुलांचा ताबा नाकारु शकत नाही- हायकोर्ट

सीरम इन्स्टिट्यूटने केंद्राला याआधी माहिती दिली होती की, जून महिन्यात 10 कोटी कोविशील्डचे डोस तयार करेल आणि पुरवठा करू शकतील. सध्या नोव्हावॅक्स लसीची निर्मितीही केली जात आहे. यासाठी अमेरिकेकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे.

लशीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने एप्रिलमध्ये परवानगी दिली होती. रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक लशीची 30 लाख डोसची एक खेप भारतात मंगळवारी भारतात पोहोचली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी खेप आहे. स्पुटनिक व्ही लशीचा साठा शून्य ते 20 अंश सेल्सियस डीग्रीपेक्षा कमी तापमान लागते. भारतात रेड्डी लॅबला स्पुटनिक व्ही लशीच्या आपत्कालीन वापराला आधीच मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.