शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच!

सर्व राज्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांकडे निवेदन सादर करण्याच्या सूचना
नवी दिल्ली : आंदोलनासाठी दिल्ली-गाझीपूर बॉर्डरवर ट्रॅक्टरसह दाखल झालेले शेतकरी.
नवी दिल्ली : आंदोलनासाठी दिल्ली-गाझीपूर बॉर्डरवर ट्रॅक्टरसह दाखल झालेले शेतकरी.
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदलनाला आज (२६ जून) सात महिने पूर्ण होत आहेत. जोपर्यंत हे जाचक कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यावर शेतकरी नेते ठाम आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेलं हे आंदोलन आता राजधानी दिल्लीकडे नेण्याचा निश्चिय शनिवारी शेतकऱ्यांनी केला. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं (DMRC) तीन मेट्रो स्टेशन्स बंद ठेवली होती. (Seven months of agitation Farmers plan march to Delhi three metro stations shut)

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चानं सर्व राज्यांच्या शेतकऱ्यांना आवाहन केलंय की, त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबत राष्ट्रपतींच्या नावाचं निवेदन तयार करावं आणि ते त्यांच्या राज्यपालांकडे सूपूर्द करावं. दरम्यान, आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून 'खेती बचाओ, लोकतंत्र बचाव' दिवस पाळण्यात आला. दरम्यान, सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानुसार, यलो लाईनवरील विश्वविद्यालय, सिव्हिल लाईन आणि विधान सभा ही तीन मेट्रो स्टेशन्स शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

अमेरिकेतही निषेध रॅली

शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, सहारनपूर आणि शिसैली येथून हजारो शेतकरी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह गाझीपूर गेटवर पोहोचले आहेत. शनिवारी निघालेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टर्ससह इथे दाखल झाले आहेत. दरम्यान, भारतातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेतील मॅच्युसेट येथेही भारतातील कृषी कायद्यांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.