Teen Pregnancy वाढतेय; लैंगिक शिक्षणावर पुन्हा विचार व्हावा : HC

kerala high court
kerala high court
Updated on

कोच्चि : अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्‍याच्‍या प्रमाणात होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचं निरीक्षण केरल उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच अश्लील साहित्य इंटरनेटवर अगदी सहजतेने उपलब्ध होत असून लहान मुलांच्या हातात चुकीच्या गोष्टी पोहोचत आहेत. त्यामुळे त्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत सांगणं गरजेचं आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमातील लैंगिक शिक्षणावर पुन्हा एकदा विचार व्हायला हवा, अस निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. (increasing cases of teen pregnancy news in Marathi)

kerala high court
मुकेश अंबानींसह कुटुंबीयांना VIP सुरक्षा कायम राहणार; SC ची केंद्र सरकारला संमती

“सध्या शाळेत देण्यात येत असलेल्या लैंगिक शिक्षणावर पुन्हा एकदा विचार होणं गरजेचं असल्याचं न्यायमूर्ति व्ही. अरुण यांनी म्हटलं. एका 13 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताला परवानगी देताना अरुण यांनी हे निरीक्षण नोंदवलं. या प्रकरणात मुलीला तिच्या अल्पवयीन भावाकडून गर्भधारणा झाली आहे.

न्यायमूर्ति अरुण म्हणाले की, “आजच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन कुमारी मुलींमध्ये गर्भधारणेचं प्रमाण वाढणे चिंताजनक असल्याचं मत मी नोंदवत आहे. तसेच अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबातील जवळचे नातेवाईकचं जबाबदार असतात. त्यामुळे शाळेत देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणावर आता पुन्हा एकदा विचार होणं गरजेचं आहे.

kerala high court
National Film Award 2022 List: पुरस्कारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर

ते म्हणाले, ''इंटरनेटवर अश्लील साहित्य सहज उपलब्ध होत असून याचा अल्पवयीन मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे लहान मुलांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराविषयी सांगणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.