Bhuvaneshvar Latest Crime: लष्करातील अधिकाऱ्याच्या वाग्दत्त वधूवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून ओडिशा पोलिस मुख्यालयाने भरतपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
तसेच लष्करी अधिकाऱ्याला मारहाण आणि त्याच्या वाग्दत वधूवर लैंगिक टिपणी केल्याप्रकरणी अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांना अटक केल्याचे पोलिस आयुक्तालयाने शनिवारी सांगितले.
अत्यंत घृणास्पद घटना रविवारी (ता.१५) रात्री उशीरा घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात विद्यार्थ्यांना काल अटक केली. त्यांना लगेच न्यायालयात हजर करण्यात आले. भुवनेश्वरमधील पथरागडीयाजवळ तीन मोटारीतून आलेल्या १२ जणांनी लष्करी अधिकाऱ्याचे वाहन अडविले होते.
अधिकाऱ्याने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. गुंडांच्या तावडीतून पळून जाण्यात हे जोडपे यशस्वी झाले. भरतपूर ठाण्यात रात्री दोन वाजता पोचल्यावर त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली.