Shadani Darbar : भारतीय लोक पाकिस्तानला का निघालेत?; १०० भारतीयांनाच का दिला पाकने व्हीजा!

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 100 हून अधिक भारतीय यात्रेकरू पाकिस्तानात दाखल झाले आहेत.
Shadani Darbar
Shadani Darbargoogle
Updated on

मुंबई : पाकिस्ताननधील सिंधमधील हिंदू संत सतगुरु संत शादाराम साहिब यांच्या 314 व्या जयंती सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात काही भारतीयांना सहभागी व्हायचे होते.

पाकिस्तानने हयात पिटाफी येथील शदानी दरबारला भेट देऊ इच्छिणाऱ्या १०० भारतीय यात्रेकरूंना व्हिसा मंजूर केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 100 हून अधिक भारतीय यात्रेकरू पाकिस्तानात दाखल झाले आहेत.

भारतातील हे यात्रेकरू 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पाकिस्तानमध्ये मुक्काम करणार आहेत. ते काळात सुक्कूर, ढेरकी आणि नानकाना साहिब या तीन अन्य पवित्र तिर्थस्थानांनाही भेट देतील.

शदानी दरबारला सिंधी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. त्या तिर्थस्थानाला एवढे खास महत्त्व का आहे. याबद्दल जाणून घेऊयात.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील शदानी दरबार हे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे घोटकी जिल्ह्यातील हयात पिटाफी या ठिकाणी आहे. याची स्थापना 1786 मध्ये संत शादाराम साहिब यांनी केली होती, ज्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अनेक यात्रेकरू भेट देतात.

काय आहे 1974 मधील भारत-पाकिस्तान प्रोटोकॉल

भारत पाकिस्तानच्या फाळणीमध्ये दोन्ही देशातील नागरीकांच्या हिताचे नियमही बनवण्यात आले होते. या प्रोटोकॉलनुसार, दोन्ही देशांतील यात्रेकरूंना इमिग्रेशन प्रक्रियेतून न जाता विशिष्ट धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी व्हिसा दिला जातो. हा व्हीजा केवळ यात्रेकरू समुहालाच दिला जातो. या प्रोटोकॉलमध्ये भारतातील पाच आणि पाकिस्तानमधील 15 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

साहिब संत शादाराम कोण होते?

संत शादाराम यांचा जन्म 1708 मध्ये लाहोरमधील येथील लोहाना खत्री कुटुंबात झाला. त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानले जाते. तसेच, प्रभू श्रीरामांचे पुत्र लाव यांचे ते वंशज असल्याची मान्यताही आहे.

1768 मध्ये संत शादाराम राजा नंदाच्या अधिपत्याखाली सिंधची राजधानी माथेलो येथे पोहोचले. तिथे त्यांनी एक शिवमंदिर बांधले त्या मंदिरात एक पेटती ज्वाला त्यांनी निर्माण केली. त्याला धुनी साहिब म्हणून ओळखले जाते.

संत शादाराम यांच्या गादीवर आजवर आठ लोक बसले. त्यात माता साहिब हसी देवी पहिली महिला संतही होत्या. आता डॉ.युधिष्ठर लाल हे या गादीवर बसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.