नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या उत्तरार्धात महागाईत हळूहळू घट अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला महागाईपासूनही (Inflation) दिलासा मिळू शकतो, असे आरबीआयचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी शनिवारी (ता. ९) सांगितले. मध्यवर्ती बँक महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आर्थिक उपाययोजना सुरू ठेवेल. जेणेकरून मजबूत आणि शाश्वत विकास साधता येईल, असेही ते म्हणाले. (Shaktikanta Das said, Inflation can be relieved soon)
बाजार पुरवठा चांगला दिसत आहे. अनेक उच्च वारंवारता निर्देशक २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) पुनर्प्राप्तीकडे निर्देश करीत आहे. आमचे सध्याचे मूल्यांकन असे आहे की २०२२-२३ च्या उत्तरार्धात महागाई हळूहळू कमी होऊ शकते. कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव दरम्यान आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी या गोष्टी सांगितल्या.
सध्याचे युग महागाईच्या जागतिकीकरणाचे आहे. याचा फटका जगाला बसत आहे. कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, महागाई अजूनही मोठी समस्या आहे. ती अजूनही मध्यवर्ती बँकांच्या अंदाजापेक्षा वरच आहे, असेही शक्तिकांत दास म्हणाले. यामुळे अर्थव्यवस्थेत मोठी मंदी येण्याची शक्यताही कमी झाली आहे.
पॉलिसी रेट वाढवण्याचा निर्णय!
वाढत्या महागाईचा (Inflation) सामना करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून रेपोमध्ये सुमारे ४.९ टक्के वाढ केली आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत आरबीआयचे रेट सेटिंग पॅनल पॉलिसी रेट वाढवण्याचा निर्णय घेऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
वेळीच पावले उचलली पाहिजे
जरी आमच्या नियंत्रणाबाहेरील घटक अल्पावधीत चलनवाढीवर परिणाम करू शकतात. परंतु, मध्यम कालावधीत त्याची हालचाल चलनविषयक धोरणाद्वारे निश्चित केली जाईल. त्यामुळे चलनविषयक धोरणाने चलनवाढ स्थिर ठेवण्यासाठी वेळीच पावले उचलली पाहिजेत. जेणेकरून अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आणि शाश्वत वाढीच्या मार्गावर नेता येईल, असेही शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले.
धोरणांचे पुनरावलोकन करीत राहू
आम्ही समष्टी आर्थिक स्थिरता राखणे आणि प्रोत्साहन देण्याच्या ध्येयाने आमच्या धोरणांचे पुनरावलोकन करीत राहू. चलनविषयक धोरण समितीने एप्रिल आणि जूनच्या बैठकीत २०२२-२३ साठी महागाईचा अंदाज ६.७ टक्क्यांवर सुधारला, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.