Sharad Pawar Beed: पवारांची बीडची सभा ठरवणार पुढची दिशा, सगळे संभ्रम होणार दूर; अजित पवार घेणार मोठा निर्णय

Sharad Pawar Beed Sabha: अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक सायंकाळी पाच वाजता देवगिरी बंगल्यावर
Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar VS Sharad PawarEsakal
Updated on

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होणार आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शरद पवारांची सभा होणार आहे. यामुळे शरद पवार हे यावेळी नक्की काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांची ही सभा झाल्यानंतर आज अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक सायंकाळी पाच वाजता देवगिरी बंगल्यावर घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Rahul Gandhi On Nehru : नेहरू त्यांच्या नावामुळे ओळखले जात नाहीत, तर....! ; राहुल गांधींनी केली केंद्र सरकारवर टीका

शरद पवार बीडच्या सभेत आज नक्की काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष असल्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर अजित पवार गटाच्या पुढच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी समोर आणली आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Sharad Pawar : "शिवसेनेबाबतच्या निर्णयात केंद्राचा हस्तक्षेप पण मला चिन्हाची चिंता नाही"

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी या दोघांची जवळीक संपूर्ण महाराष्ट्राला संभ्रमात टाकणारी आहे. यातच नुकतीच अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Sharad Pawar: मंगळवेढ्यात पवारांचे तीन स्वतंत्र सत्कार, बंडामुळे 'राष्ट्रवादी पुन्हा'चं कसं?

यामुळे हा संभ्रम अजूनच वाढला आहे. मात्र शरद पवारांच्या आजच्या बीडच्या सभेनंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. यामुळेच की काय अजित पवार गटातील नेत्यांचेही शरद पवारांच्या आजच्या सभेकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Shivsena Vs BJP: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप-सेनेच्या समर्थकांमध्ये पुन्हा राडा; भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण

शरद पवार यांची सभा होताच आणि त्यांची भूमिका स्पष्ट होताच लगेच सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामुळे अजित पवार गट देखील आपली आगामी काळातील रणनीती या बैठकीमध्ये ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.