पवार-शहांची दिल्लीत भेट; राजकीय चाणक्यांमध्ये काय झाली चर्चा?

पवार-शहांची दिल्लीत भेट; राजकीय चाणक्यांमध्ये काय झाली चर्चा?
Updated on

नवी दिल्ली : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतलीय. संसदेतील अमित शहांच्या कार्यालयात ही भेट झाली आहे. या भेटीवेळी खासदार सुनीट तटकरे देखील उपस्थित होते. ही भेट कशासाठी आहे, याबाबत तर्क-कुतर्क सुरु होते. या भेटीबाबतची माहिती आणि तपशील शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत आज नवी दिल्लीमध्ये एक संक्षिप्त बैठक झाली. एनएफसीएसएफ (नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड) चे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांच्यासह साखर सहकारी क्षेत्रासमोरील समस्यांवर आम्ही चर्चा केली. पुढे त्यांनी म्हटलंय की, सर्वप्रथम, मी अमित शहा यांचे भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. बैठकीदरम्यान, आम्ही देशातील साखरेची सद्य परिस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्या यांवर चर्चा केली.

एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी यासारख्या दोन सर्वात उदयोन्मुख आणि गंभीर समस्या आम्ही त्याच्या निदर्शनास आणल्या. आम्हाला आशा आहे की माननीय सहकार मंत्री हे मुद्दे लवकरात लवकर अनुकूलपणे विचार करतील आणि सोडवतील, असंही ते म्हणाले.

पवार-शहांची दिल्लीत भेट; राजकीय चाणक्यांमध्ये काय झाली चर्चा?
'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज
पवार-शहांची दिल्लीत भेट; राजकीय चाणक्यांमध्ये काय झाली चर्चा?
'पेगॅसस'चं सत्य बाहेर येणार? सुप्रीम कोर्टात येत्या ५ ऑगस्टला सुणावणी

सुनील तटकरे यांनी या भेटीबद्दल माहिती देताना म्हटलंय की, महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमध्ये लोकांचं खूप नुकसान झालं आहे. त्यासंदर्भात चर्चा झाली. लोकांच्या मदतीसाठी आता तातडीने उपाययोजना करण्याबाबत ही चर्चा झाली. यामध्ये विमा कंपन्यांची तत्परता दिसून येत नाहीये. त्याबाबत बोलणं झालं. महाडला एनडीआरएफचा कॅम्प व्हावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे मांडला आहे. एनडीआरएफचे निकष बदलण्याची मागणीही केली. या सगळ्या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या १५-२० दिवसांत ते निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो, सुनील तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.