"मोदींविरोधात एकत्र लढणार" ; विरोधकंच्या एकजुटीसाठी पवारांनी घेतली खर्गे आणि राहुल गांधींची भेट

sharad pawar
sharad pawar
Updated on

दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर जाहीर केलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नाराजी वाढली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देखील नाराज होते. दरम्यान ही नाराजी दुरू झाल्याची चर्चा आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशात एकता ठेवायची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही एकत्र होऊन लढण्यास तयार आहोत. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्र होऊन लढणार. देशातील अनेक विरोधी नेत्यांशी आम्ही संवाद साधणार आहोत. हाच विचार शरद पवार यांचा आहे.हीच आज चर्चा झाली आहे.

शरद पवार म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले तेच विचार आमचे सर्वांचे आहेत. विचारधारा सारख्या असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही तर सुरूवात आहे.ममताजी, केजरीवाल यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. त्यांना एकत्र येण्यासाठी विनंती करणार आहोत.

sharad pawar
Muslim Reservation : मुस्लिमांचं आरक्षण काढून घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

राहुल गांधी म्हणाले विरोधकांना एकत्र आणण्यासाठी एक प्रोसेस सुरु झाली आहे. ही सुरूवात आहे. पुढे देशातील विरोधी नेत्यांशी आम्ही भेटणार आहोत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी एकजुटीची कसरत जोरात सुरू झाली आहे. बुधवारी नितीशकुमार यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी आज (गुरुवार) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

शरद पवार यांच्यासोबतची काँग्रेस नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे कारण अलीकडच्या काळात शरद पवार यांनी काही मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळे वक्तव्य केले होते. शरद पवार हे विरोधी पक्षांचे सर्वात अनुभवी नेते मानले जातात आणि महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या युतीतील ते मुख्य दुवा आहेत.

sharad pawar
Asad Ahmed Encounter: अतिक अहमदचे पाकिस्तान, ISI, लष्कर-ए-तोयबाशी संबंध; ड्रोनद्वारे मागवायचा हत्यारं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.