Sharad Pawar : जगदीप धनकड यांच्या मिमिक्री प्रकरणावर शरद पवारांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले...

संसदेतून विरोधी पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी देखील यामुद्द्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

संसदेतून विरोधी पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर यांची मिमिक्री केली आणि राहुल गांधी त्यांचा व्हिडीओ बनवत असल्यावरून देखील मोठा गदारोळ झाला. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगदीप धनखड यांची खासदार नक्कल करत होते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांचा व्हिडीओ काढत होते हे योग्य होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, साधी गोष्ट आहे, ते सभागृहात केले गेले का? सभागृहाच्या बाहेर काही झालं, जसं की मी इथे काही केलं तर त्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल, ती पक्षाच्या नेत्यावर कशी येईल. कोणी काही केलं तर त्यावर चर्चा केली जाऊ शकते. जे झालं ते सभागृहाच्या बाहेर झालं.

माझ्याविरोधात असं काही झालं तर मी मराठा आहे, मी शेतकरी आहे, हा मराठ्यांचा-शेतकऱ्यांचा अपमान आहे असे म्हणणे जनता आणि प्रोफेशनचा अपमान आहे, आम्ही असं कधीच करणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

 Sharad Pawar
Indapur School Bus Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात! शिक्षक जागीच ठार; पाच ते सहा विद्यार्थी जखमी

खासदारांच्या निलंबनाचा मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सभागृहाचे सदस्य नसलेले काही लोक सभागृहात दाखल झाले, ते कसे आले? त्यांना कोणाचा पास मिळाला? यावर सरकारकडून निवेदन केलं जाणं गरजेचं होतं. सभागृहाचा तो अधिकार होता. आम्ही स्टेटमेंट मागितलं, त्याची मागणी लावून धरली. त्याचा परिणाम म्हणून ही मागणी करणाऱ्याना बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली. यापूर्वी सभागृहात असं कधी झालं नव्हतं.

 Sharad Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

विधानसभा असो किंवा संसद ५६ वर्षांपासून मी संसदेत येतोय. पण आजवर मी कधीही असा प्रकार झाल्याचे पाहिले नाही. विरोधकांना दूर ठेवून सभागृहाचं कारभार चालवला जात आहे. त्यांना हवा तसा कारभार ते करु शकतात. पण देशाची जनता हे पाहत आहे आणि याची मोठी किंमत योग्य वेळी जनता वसूल करेल असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.