Sharad Pawar: 'तुतारी' आता वाजतच राहणार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली.
Sharad Pawar Party New Symbol 'Tutari'
Sharad Pawar Party New Symbol 'Tutari'
Updated on

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवार यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं कलम 29 B नुसार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. साम टीव्हानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Sharad Pawar party and symbol Tutari will official sanction by Election Commission of India)

Sharad Pawar Party New Symbol 'Tutari'
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी राजेश शहा यांना जामीन मंजूर; पोलिसांना कोर्टाचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यामध्ये या पक्षाला लोकसेभीसाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आता यापुढेही कायम राहणार आहे. याला निवडणूक आयोगानं अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळं आता या पक्षाला 29 B अंतर्गत देणग्याही स्विकारता येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sharad Pawar Party New Symbol 'Tutari'
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी राजेश शहा यांना जामीन मंजूर; पोलिसांना कोर्टाचा झटका

याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूप्त देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता.

तसेच टैक्स बॅनिफेटही मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली. दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजन बद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथं असेल तिथं दुसरा तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणाला त्यावर आम्ही अभ्यास करू, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.