माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी दिल्लीमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलामध्ये (RJD) आपला पक्ष लोकतांत्रिक जनता दलाचे (LJD) विलीनीकरण केलं आहे. यावेळी बोलताना शरद यादव यांनी म्हटलंय की, आमच्या पक्षाचं राजदमध्ये विलय होणे म्हणजे विरोधी पक्षांची एकजूटीकडे वाटचाल होण्याच्या दिशेने पहिले पाऊल होय.
भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये विरोधी पक्षांची एकजूट होण्याची गरज आहे. सध्यातरी एकीकरण करणं आमची प्राथमिकता आहे. यानंतर आम्ही ठरवू की, या एकजूट झालेल्या विरोधकांचं नेतृत्व कोण करेल.
शरद यादव यांच्या दिल्लीतील घरी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यादव यांच्या नेतृत्वाखाली ही विलयीकरणाची प्रक्रिया पार पडली. जनता दल युनायटेडमधून बाहेर पडल्यानंतरच शरद यादव यांनी लोकतांत्रिरक जनता दल या नावाने आपला वेगळा पक्ष स्थापित केला होता.
याबाबत बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी म्हटलंय की, शरद यादव यांनी घेतलेला हा पक्ष विलीनीकरणाचा निर्णय ही जनतेची मागणी होती. या निर्णयामुळे इतर विरोधी पक्षांनाही संदेश गेला आहे की, आपली एकजूट २०१९ मध्येच व्हायला हवी होती. मात्र, कधीच न होण्यापेक्षा उशीराने का होईना होतेय, हे महत्त्वाचे आहे.
याआधी शरद यादव यांनी १६ मार्च रोजी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, देशात मजबूत विरोधी पक्ष स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून समविचारी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच मी लोकतांत्रिक जनता दलाचा राष्ट्रीय जनता दलामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.