मुंबई : परदेशी वित्तसंस्थांच्या जोरदार खरेदीच्या बळावर सेन्सेक्सने आज ६२ हजारांना स्पर्श करूनही दिवसअखेर अल्प घसरण दाखवली. आज जास्त संख्येने शेअर तेजीत असूनही निर्देशांक मात्र कोसळल्याचे विरोधाभासी वातावरण दिसून आले. आज सेन्सेक्स ३५.६८ अंश तर निफ्टी १८.१० अंश घसरला.
आज सुरुवात चांगली झाल्यानंतरही बाजार फार तेजी दाखवू शकले नाही. सेन्सेक्सने आज ६२ हजारांना स्पर्श करून ६२,१६८.२२ असा उच्चांकही नोंदवला. मात्र तेथून त्याची घसरण झाली. दिवस अखेर सेन्सेक्स ६१,९०४.५२ अंशांवर तर निफ्टी १८,२९७ अंशांवर स्थिरावला.
चांगले निकाल देऊनही बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ते कमी असल्यामुळे आज एलअँडटी साडेपाच टक्के कोसळून २,२४१ रुपयांवर बंद झाला. त्याखेरीज आयटीसी, एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील व इन्फोसिस या शेअरचे भावही अर्धा ते एक टक्का पडले. दुसरीकडे हिंदुस्थान युनिलीव्हर पावणेतीन टक्के वाढला तर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एचसीएल टेक, सनफार्मा, अॅक्सीस बँक, एचडीएफसी या शेअरचे भावही अर्धा ते एक टक्का वाढले.
"अमेरिकी चलनवाढीच्या आकड्यांपाठोपाठ आता भारतीय चलनवाढीच्या आकड्यांकडे सर्वांचे लक्ष आहे. परदेशी वित्तसंस्था सतत खरेदी करत असल्या तरी भारतीय शेअर बाजार निर्देशांक अद्यापि विशिष्ट टप्प्यातच आहेत. पण तरीही निर्देशांक वरच्या दिशेने जात आहेत आणि त्यात जास्त घसरण होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअरचे भाव घसरल्यास खरेदी करण्याचे धोरण ठेवावे."
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.