गुरुग्राम : दिवंगत माजी राष्ट्रपती तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी नुकतेच 'प्रणब माय फादर' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबाबत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. (Sharmistha Mukherjee Author and Daughter of Former President Pranab Mukherjee writes about Rahul Gandhi)
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात AM-PM हा वेळेसबंधीचा एक किस्सा कथन केला आहे. आपल्या वडिलांबाबतचा हा किस्सा सांगताना त्यांनी म्हटलं की, एक दिवस प्रणब मुखर्जी राष्ट्रपती असताना ते आपलं निवासस्थान असलेल्या मुगल गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. पण याचवेळी अचानक राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी आले. माझ्या वडिलांना पुजा आणि मॉर्निंग वॉक वेळी कोणीही भेटायला येणं आवडत नव्हतं. पण तरीही त्यांनी राहुल गांधींची भेटायचं ठरवलं. पण ही गोष्ट इतकीच नाही. (Latest Marathi News)
खरंतर राहुल गांधींचा प्रणब मुखर्जींसोबत भेटीची वेळ ठरली होती. ही वेळ संध्याकाळची होती. पण राहुल गांधींच्या ऑफिसनं त्यांना चुकून सकाळची वेळ असल्याचं सांगितलं. मी स्वतः याबाबत एका एडीसीसोबत चर्चा केली होती. या राहुल गांधींच्या सकाळच्या भेटीबाबत मी एकदा वडिलांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की, राहुल गांधींच्या ऑफिसला AM आणि PM यामधला फरक कळत नाही. तर एक दिवस आपण पीएमओ सांभाळू अशी आशा ते कशी करु शकतात.
प्रणब मुखर्जींनी आपल्या मुलीला हे ही सांगितलं होतं की, २८ डिसेंबर २०१३ रोजी काँग्रेसच्या स्थापनादिनी होणाऱ्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला देखील राहुल गांधी आले नव्हते. त्यानंतर ६ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. तसेच प्रणब मुखर्जी यांनी आपल्या डायरीत लिहिलं होतं की, राहुल गांधी AICC अर्थात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीला देखील हजेरी लावत नसत.
मला याची कारणं माहिती नाहीत, पण असं अनेक वेळा झालं आहे. प्रत्येक गोष्टीला ते खूपच नॉर्मल पद्धतीनं घेत होते. त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीची कोणतीही किंमत नव्हती. सोनियाजी आपल्या मुलाला उत्तराधिकारी बनवू पाहत आहेत पण या तरुणामध्ये करिश्मा आणि राजकिय समज कमी असणं हे अडचण निर्माण करु शकतं. ते काँग्रेसला पुनरुज्जीवित करु शकतात का? लोकांना ते प्रेरित करु शकतात का? हे मला माहिती नाही. पक्षाच्या कठीण काळात राहुल गांधी अचानक ब्रेक घेत होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी असंही लिहिलंय की, प्रणब मुखर्जींना असं ठाम वाटायचं की, राहुल गांधी यांच्यामध्ये काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याची क्षमता नाही. पण आज तर माझे वडील असते तर ते राहुल गांधींची १४५ दिवसांची भारत जोडो यात्रा पाहिली असती तर त्यांचं जरुर कौतुक केलं असतं. (Marathi Tajya Batmya)
प्रणब मुखर्जी हे इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात महत्वाच्या पदावर राहिले. त्यांनी संरक्षण मंत्रालयापासून अर्थमंत्रालयाचा देखील कारभार सांभाळला. त्याचबरोबर ते देशाचे राष्ट्रपती देखील राहिले. शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकात अशा महत्वाच्या पदांवर काम केलेल्या प्रणब मुखर्जींच्या डायरीमधील काही भाग आहे. ज्यामधून त्यांचे विचार आणि तत्कालीन राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.