...तर राहुल गांधींना लवकरात लवकर अध्यक्ष करा - शशी थरुर

येत्या काळात विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षात बदलाची मागणी
Rahul Gandhi_Shashi Tharoor
Rahul Gandhi_Shashi Tharoor
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, पक्षाला नवीन नेतृत्वाची गरज आहे. जर राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचं असेल तर हे लवकर व्हायला हवं. काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर नेतृत्व बदल करणं गरजंच आहे.

Rahul Gandhi_Shashi Tharoor
'अपमानित झाल्यासारखं वाटतंय'; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

थरुर यांनी नेतृत्वात बदलाची मागणी करण्याबरोबरच विद्यमान हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कोणतंही भाष्य केलं नाही. त्यांनी म्हटलं की, सोनिया गांधी स्वतः हंगामी अध्यक्षपद सोडू इच्छित आहेत. त्यामुळे पक्षाला लवकरात लवकर पक्षाचा नवा नेता निश्चित करायला हवा.

Rahul Gandhi_Shashi Tharoor
'न्यायव्यवस्थेचं भारतीयकरण हवं': सरन्यायाधीश रमणा

थरुर यांचा काँग्रेसच्या त्या २३ असंतुष्ट नेत्यांमध्ये समावेश आहे, जे पक्षाच्या नव्या नेतृत्वाची मागणी करत आले आहेत. गेल्या वर्षी G-23 च्या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षामध्ये व्यापक बदलाची मागणी केली होती.

Rahul Gandhi_Shashi Tharoor
लॉकडाऊनच्या काळात मांजरींनाही आले नैराश्य, संशोधनाचा निष्कर्ष

शनिवारी तिरुवअनंतपुरममध्ये पत्रकाराशी बोलताना थरुर म्हणाले, जर राहुल गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळायचं असेल तर लवकरात लवकर त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायला हवी. जर काँग्रेसला परत सत्ता काबीज करायची असेल तर लवकरच पक्षाचं नेतृत्वबदल करुन निवडणुकांचा सामना करायला तयार रहावं लागेल. काँग्रेसच्या विविध शाखांची इच्छा आहे की, राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाचा अध्यक्ष निवडायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.