Sharad Pawar On JPC : शरद पवारांचं लॉजिक योग्य, पण…; JPC बाबतच्या भूमिकेवर शशी थरूर यांची प्रतिक्रिया

Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC gautam adani hindenburg research case
Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC gautam adani hindenburg research case
Updated on

Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी अदानी प्रकरणात जेपीसीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी (9 एप्रिल) शशी थरूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जेपीसीबाबत पवारांच्या तर्काशी सहमत असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वतःची भूमिका देखील मांडली आहे.

शशी थरूर काय म्हणाले?

शरद पवार यांच्या विधानाबद्दल बोलतना शशी थरूर म्हणाले की, आम्हाला त्यांचं (शरद पवार) लॉजिक आम्हाला समजतं, कारण जेपीसीचा नियम असा आहे की संसदेत बहुमत असलेला सत्ताधारी पक्षही समितीत सामील होईल. जेपीसीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक भाजप आणि एनडीए पक्षांचे असतील. पण मग आम्हाला वाटते की यामध्ये विरोधी पक्ष सर्व प्रश्न विचारू शकतील आणि जेपीसीच्या अधिकार्‍यांकडून कोणतेही उत्तर मागू शकतील, ते कागदपत्रे मागू शकतील, फायली देखील पाहू शकतील.

Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC gautam adani hindenburg research case
"बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात…हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?"

त्यामुळे जेपीसीचा जो अधिकार तो उपयोगी पडेल असे आमच्या पक्षातील लोक म्हणत आहे. सरतेशेवटी, तुम्हाला माहित आहे की आजपर्यंत सरकार (जेपीसीसाठी) तयार नाहीये, परंतु पवारसाहेब ज्या विषयावर वेगळे बोलत आहेत, ते तुम्ही विसरून जा... ते (शरद पवार) संसदेत आमच्यासोबत उभे आहेत. 6 तारखेला संसद तहकूब झाली तेव्हा राष्ट्रवादी आमच्यासोबत आली, आम्ही सर्व 19-20 पक्ष विजय चौकापर्यत पोहचलो , राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, असेही थरूर यांनी सांगितले.

Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC gautam adani hindenburg research case
Bhupinder Singh Hooda Accident: हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले प्राण

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (7 एप्रिल) एका वृत्तवाहिनीशी बोलताना अदानी समूहाचा बचाव करत हिंडेनबर्ग रिसर्चच्या प्रासंगिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासोबत ते म्हणाले होते , मी पूर्णपणे जेपीसीच्या विरोधात नाही... जेपीसी अनेक वेळा स्थापन झाली आहे आणि मी काही जेपीसीचा अध्यक्षही राहिलो आहे. जेपीसीची स्थापना बहुमताच्या आधारे (संसदेत) केली जाईल. जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य आणि प्रभावी ठरेल असे मला वाटते.

गौतम अदानी यांच्या कंपन्यांमधील शेअर्स आणि अकाउंटिंगमध्ये हेराफेरी आणि फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या मागील पार्श्वभूमिची आपल्याला माहिती नसल्याचेही पवार म्हणाले होते.

Shashi Tharoor On Sharad Pawar Remarks Over JPC gautam adani hindenburg research case
Pune Rain News : पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं; वाहतूक कोंडी अन् वीजही गेली

पवारांनी पुन्हा भूमिका स्पष्ट केली

या विधानावर काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांनंतर शरद पवार यांनी शनिवारी (8 एप्रिल) पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला आपण पाठिंबा दिला आहे असे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.