शशी थरुर यांचा मोबाईल अॅपवर कारवाईचा इशारा; जाणून घ्या, नक्की काय घडलंय?

Shashi_Tharoor
Shashi_Tharoor
Updated on

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी एका मोबाईल अॅप कंपनीला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या अॅपने जाहिरातीत आपला फोटो आणि नाव वापरल्याने यावर थरुर यांनी आक्षेप घेतला आहे. थिरुवअनंतपुरमचे खासदार असलेल्या थरुर यांनी अशा प्रकारच्या लर्निंग अॅपला आपली कसलीही मान्यता नसल्याचं ट्विट करुन म्हटलं आहे.  

ब्लॅकबोर्ड रेडियो (Blackboard radio) या बंगळुरुस्थित अॅप कंपनीने "शशी थरुर यांच्यासारखं सफाईदारपणे इंग्रजी बोला" या मथळ्याखाली थरुर यांचा फोटो वापरुन जाहिरात केली होती याद्वारे त्यांनी तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या अॅपनं 'इंग्रजी बोलायला शिका' या कार्यक्रमांतर्गत शशी थरुर यांचा दाखला दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरुर म्हणाले, "माझं नाव घेत या अॅपकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की, माझा या अॅपशी कोणताही संबंध नाही तसेच या अॅपला माझं कुठलंही समर्थन नाही."

दरम्यान, शरुर यांच्या ट्विटने त्यांच्या फॉलोवर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं या अॅपने आपल्या कोर्सला थरुर यांचं समर्थन असल्याचा कुठलाही दावा केलेला नाही. त्यांनी केवळ थरुर यांचं नाव वापरुन विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलंय. तर राजकारण्यांचे फोटो व्यावसायिक कारणासाठी वापरले जाऊ शकत नाहीत, असं इतर काही युजर्सनं म्हटलं आहे. काहींनी तर असंही सुचवलं की, थरुर यांनी स्वतः इंग्रजी शिकण्याचा कोर्स सुरु करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.