कोलकाता : मला जर असनसोलमध्ये बाहेरचं म्हटलं जात असेल तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल, या शब्दात तृणमूल काँग्रेस पक्षाचे पोटनिवडणुकीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी असनसोल लोकसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली होती. (Shatrughan Sinha Attack On BJP Over Election Issue In Asansol Lok Sabha Bypoll)
बॅनर्जी म्हणतात, तृणमूलच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदरवार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे. तसेच बाबूल सुप्रियो हे बालीगंज येथून विधानसभा निवडणूक लढवतील. बाबूल सुप्रियो यांनी राजीनामा दिल्याने असनसोल लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे.
सुप्रियो यांनी भाजपचा राजीनामा दिल्यावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बाबूल सुप्रियो यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.