Ayodhya: हनिमूनसाठी गोव्याला जायचं सांगून नेलं अयोध्येला! पत्नीनं दिला पतीला घटस्फोट

या जोडप्याचं सध्या कोर्टाकडून समुपदेशन केलं जात आहे.
love marriage divorce
love marriage divorce
Updated on

भोपाळ : हनिमूनसाठी गोव्याला जायचं सांगून अयोध्येला नेल्यानं मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका महिलेनं घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या विचित्र घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरु आहे. या जोडप्याचं कोर्टाकडून समुपदेशन केलं जात आहे. एका रिलेशनशिप काऊन्सिलरनं याबाबत माहिती दिली आहे. (She was set for Goa honeymoon husband said Ayodhya it is she filed for divorce)

love marriage divorce
Manoj Jarange Beed Sabha: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण

रिलेशनशिप काऊन्सिलर शाईल अवस्थी यांनी सांगितलं की, या जोडप्याचं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न झालं आहे. यातील नवरा मुलगा हा आयटी इंजिनिअर आहे. लग्नानंतर नववधूला आपल्या पतीला परदेशात हनिमूनसाठी जाण्याच्या मागणी केली होती. पण तिच्या नवऱ्यानं आपण भारतातील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊयात तशी माझ्या आई-वडिलांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं होतं. पण या वादात त्यांचं हनिमूनसाठी गोव्याला जायचं ठरलं. (Latest Marathi News)

love marriage divorce
Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? ममतांनंतर बदलला काँग्रेसबाबतचा सूर

पण यानंतरही गोवा ट्रिपच्या एक दिवस आधी नवऱ्यानं आपल्याला आपण अयोध्या आणि वाराणसीला चाललो आहोत कारण माझ्या आईची तशी इच्छा असल्याचं सांगितलं. यानंतर या जोडप्यानं अयोध्या-वाराणसी केलं. पण परतल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला, यानंतर महिलेनं थेट पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. (Marathi Tajya Batmya)

love marriage divorce
Manoj Jarange: 'लोणावळा करार' निर्णायक ठरणार का? दोन सरकारी शिष्टमंडळं जरांगेंच्या भेटीला

अवस्थी म्हणाली की, महिलेनं आरोप केला की पतीनं 'तिचा विश्वास तोडला आहे' आणि असाही आरोप केला आहे की, त्यांनी लग्नाच्या सुरुवातीपासूनच 'आपल्यापेक्षा आपल्या विस्तारित कुटुंबाला प्राधान्य दिलं' पण आता या दोघांनी आपलं नात संपवू नये यासाठी समुपदेशन सुरु केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.