तुम्ही याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर अवलंबून, जागतिक राजकीय इस्लाम आतापर्यंतचा सर्वांत मजबूत किंवा सर्वांत कमकुवत आहे. परंतु, या विश्वातील खरी जिंकता न आलेली युद्धे इस्लामी देशांमधील आहेत.
गाझामधील विनाश, लाल समुद्रातील कारवाया आणि इराण-पाकिस्तान यांच्यातील जशास तसे अशा पद्धतीची बॉम्बफेक त्याच्यानंतर एकमेकांना दिलेली ‘पप्पी- झप्पी’ या सगळ्याकडे एक क्षणभर दुर्लक्ष करा. जागतिक राजकीय इस्लाम आजवरचा सर्वांत मजबूत आहे किंवा सर्वांत कमकुवत आहे, हे खरेतर तुम्ही त्याकडे नेमके कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर अवलंबून आहे.
हे सर्वप्रथम स्पष्टपणे सांगू या की हा मुद्दा इस्लामवरील आस्थेचा नाही. हा मुद्दा राजकीय इस्लामचा आहे, जिथे आस्था हा ‘राजधर्म’ किंवा देशाचा धर्म आहे. अशा देशांमध्ये बहुतेकवेळा निवडून न आलेल्या नेत्यांच्या हातात सत्ता एकवटली आहे आणि तेच देशाचा धोरणात्मक प्रतिसाद ठरवत असतात.
त्यामुळे भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर अनेक देशांतील मुस्लिम समुदाय आणि नेत्यांना यातून वगळण्यात आले आहे. राजकीय इस्लामचे प्रबळ विश्व बनविणाऱ्या सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि इतर आखाती राष्ट्रे, इराण, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि आशिया आणि आफ्रिकेतील इतर अनेक देश यांच्याबद्दल आपण बोलत आहोत.
या देशांव्यतरिक्त हौथी, हिज्बुल्ला यासारखे बंडखोर आहेत. काही देशांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांपेक्षा अधिक शस्त्रे त्यांच्याकडे आहेत आणि ते त्यांचे कायम प्रदर्शन करत असतात.
खरं तर, सशस्त्र मनुष्यबळ, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हौथींच्याबाबतीत रणगाडे याबाबतीत या बिगर राजकीय शक्ती हे युरोपातील बहुसंख्य देशांपेक्षा मोठ्या आहेत.
अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट, पाकिस्तानातील बहुतेक सुन्नी (सर्व शाळांमधून, सलाफी, बरेलवी, देवबंदी) लष्कर आणि जैशे या किंवा इराणचे नवीनतम लक्ष्य असलेला जैश अल- अदल यांच्याकडे असंख्य प्राणघातक शस्त्रे आहेत. हे सर्व गट इस्लामच्या नावाखाली शासन करतात आणि अनेक देशांवर त्यांच्या प्रभाव आहे. या सर्वांचा उल्लेख आपण राजकीय इस्लाम असा करूया.
या शक्तींनी जगाला आव्हान दिले आहे आणि जगाच्या इतिहासात पूर्वी कधीही नव्हती तेवढी अस्थिरता निर्माण केली आहे.
१९७३ मधील योम किप्पूर युद्ध, दोन आखाती युद्धे यानंतर निर्माण झालेली तेलाची समस्या, ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरील हल्ला, अल-कायदा, इसिस आणि असे अनेक बंडखोर या प्रत्येकाचे भौगोलिक अस्तित्व, धोरणात्मक आवाका आणि हिंसाचाराची तीव्रता मर्यादित होती, परंतु सध्याचा त्रास जगभर आहे.
निर्बंध लादलेल्या इराणचा प्रादेशिक आणि कट्टरपंथी शक्ती म्हणून झालेला उदय हा कळीचा मुद्दा आहे. त्याचा प्रभाव आता पश्चिम आशियाच्या पलीकडे गेला आहे. इतकेच नव्हे तर रशियाही आपल्याकडील ड्रोन, दारूगोळा आणि स्वस्त क्षेपणास्त्रे त्यांना देण्यासाठी उत्सुक असते. हमास, हिज्बुल्ला आणि हौथी हे त्यांचे एखाद्या देशाप्रमाणे पाठीराखे प्रतिनिधी आहेत.
राजकीय इस्लामचे हे जग अनेक दशकांपासून नेतृत्वहीन आणि शक्तिहीन असल्यामुळे इराणचा प्रभाव वाढत आहे. ९/११ च्या हल्ल्यांनंतर, अल-कायदा आणि इसिसला कमकुवत केले. कारण या हल्ल्यामुळे अमेरिकेला लष्करी कारवाई करण्यासाठी धोरणात्मक आणि नैतिक कारण मिळाले.
अल-कायदा आणि इसिस या दोघांनीही आपापल्या परीने हे नेतृत्व हिसकावून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला. पाश्चिमात्य देश आणि उदारमतवादी शक्तींनी अरब देशांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध झालेल्या आंदोलनांना सुरुवातीला पाठिंबा दिला, त्यामुळे सध्याच्या स्थितीतील सततचा गोंधळ उदयास आला.
हुकूमशाहीपासून संपुष्टात आणून निर्वाचित लोकशाहीकडे जाण्याची कल्पना डोक्यात होती. पण एकापाठोपाठ एक देशात पण, मुस्लिम ब्रदरहूड किंवा त्यांच्यासारख्या संघटना एकापाठोपाठ एक अरब देशांत सत्तेवर आल्याने पाश्चिमात्य-उदारमतवादी उत्साह हवेत विरून गेला. याचा परिणाम म्हणजे इजिप्त आणि ट्युनिशिया, सीरिया आणि लीबिया या देशांत हुकूमशाही पुन्हा अस्तित्वात आली आणि युरोपीय देशांमध्ये निर्वासितांचा पूर आला.
समांतरपणे आफ्रिकेतही अशी अस्थिरता मोठ्या प्रमाणात घडली. पाश्चिमात्य शक्ती आता एवढ्या क्षीण झाल्या होत्या की गडाफीला मारल्यानंतर, लीबियावर कारवाई करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष मागे राहून नेतृत्व करण्याबद्दल बोलू लागले होते.
या सर्वांमुळे देशाच्या पातळीवर धोरणात्मक आणि नैतिक अधिकाराची मोठी पोकळी निर्माण झाली. त्या पोकळी इराणने प्रवेश मिळविला. राजकीय इस्लामच्या या गटातील इतर बहुतेक राष्ट्रांच्या सैन्यापेक्षा इराणमधील बिगर राजकीय कट्टरपंथी शक्ती अधिक मोठ्या आहेत.
‘नदीपासून समुद्रापर्यंत’ या घोषणेशी आपण सर्व परिचित आहोत. ही घोषणा पॅलेस्टिनींना उत्साहित करते आणि इस्रायलींना संतप्त करते. आजच्या भू-राजकीयस्थितीसाठी ते ‘भूमध्य समुद्रापासून ते लाल समुद्रातून अरबी समुद्रापर्यंत...’ वगैरे काहीतरी असायला हवे.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सर्व पाश्चात्त्य शक्ती, भारतासह इतर मित्रांच्या समर्थनासह, त्यांचे सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यास सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भारत-प्रशांत आणि दक्षिण चिनी समुद्र सुरक्षित ठेवत असल्याचे त्यांचे ढोंग आहे. विविधांगी परंतु संरेखित इस्लामी आव्हानांच्या या उदयाने मोठ्या शक्तींच्या सैन्याच्या मर्यादा उघड केल्या आहेत.
इतर शक्तींची ताकदही वाढत आहेत. कायम दोलायमान स्थितीत असलेले कतार हे एक राष्ट्र आहे. एकीकडे ते इस्लामी राष्ट्रांच्या बाजूने असल्याचे दाखवते व दुसरीकडे ते स्वतःपुरता निर्णय घेते. उल्लेखनीय बाब म्हणजे अमेरिका, इराण, हमास आणि इस्रायलींसाठी एकाच वेळी ते ‘अपरिहार्य’ राष्ट्र आहे.
इजिप्तमधील सिसी यांना एक नवा मार्ग सापडला आहे. त्याद्वारे त्यांनी अमेरिकेच्या शीर्ष राजनैतिक अधिकाऱ्यांनाही वाट पाहायला लावली आहे. अमेरिकेशी धुसफूस न करता त्यांनी ज्याला ते निवडणूक म्हणतात ती जिंकली आहे. या सर्वांमुळे पाश्चात्त्य शक्तींसमोरील शीतयुद्धाच्यानंतर सर्वांत मोठ्या आव्हानात भरच पडली आहे.
मग हे राजकीय इस्लामचे जग आजवरचे सर्वांत कमकुवत आहे असा प्रतिवाद आपण कसा बनवायचा? प्रथम, ही लढाई आणि संघर्ष कितीही दीर्घकाळ चालला तरी शेवटी तो संपेल आणि ‘इस्लामवादी’ गट जिंकणार नाही. एकदा आपण इराण आणि त्याच्या पाठीराख्यांचा विजय नाकारला की, या विशिष्ट इस्लामिक जगात फक्त आखाती देश आणि तुर्की उरतात. ते पूर्वीपेक्षा कमकुवत आहेत, गाझाबद्दल स्पष्टतेसह बाजू निवडण्यात अक्षम आहेत आणि अमेरिकेचे हस्तक म्हणून त्यांचे अस्तित्व आहे.
एर्दोगानने तुर्कीची प्रतिमा आशियापेक्षा पूर्व युरोपमध्ये डील-मेकर आणि डील-ब्रोकर अशी केली आहे, तेल किंवा वायू नसलेल्या मेगा कतारप्रमाणे. ते आता भारतीय उपखंडात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा अधोरेखित होतात. म्हणून, या विश्वातील खरी जिंकू न शकणारी युद्धे त्यांच्या स्वतःच्या इस्लामिक राज्यांमधील आहेत. इराण-पाकिस्तान यांच्यातील कुरबुरी हा केवळ एक नवा तमाशा आहे.
झिया यांच्यानंतर, लोकशाहीने पाकिस्तानला, त्यांच्या इस्लामीकरणापासून दूर जाण्याचा आणि इंडोनेशियासारखी स्वतःची प्रतिमा तयार करण्याची किंवा बांगलादेशकडून शिकण्याचा पर्याय दिला. त्यांनी स्वतःचे असे मूलतः इस्लामीकरण असलेला देश तयार केला आहे. जागतिक स्तरावर प्रभाव पाडण्याच्या शर्यतीत ते पराभूतांमध्येच त्यांची गणना करावी लागेल. आणि शेवटी, एक श्रेणी ज्याबद्दल आपण पुरेसे बोलत नाही.
कायमस्वरूपी शांततेत राहणारे जगातील बहुतेक मुस्लिम या गटाबाहेरील राष्ट्रांचे आहेत: ते म्हणजे मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया आणि भारत. पहिल्या दोनमध्ये इस्लाम हा राज्य धर्म आहे, परंतु ते दहशतवादी ‘पॅन-इस्लाम’वाद टाळतात. या आणि अशा इतर राज्यांतील मुस्लिमांची संख्या जवळपास एक अब्ज इतकी आहे. हे मुस्लिम समुदायदेखील विजेते आहेत आणि कोणाशीही भांडण न करता.
संपूर्ण इस्लामीकरण निवडून या गटात मालदीव नुकताच अपवाद ठरला आहे. इजिप्तकडे डोळेझाक करणारी पाश्चिमात्य राष्ट्रे, आखाती देशांच्या हुकुमशहांवर प्रेम करतात, पाकिस्तानी सैन्य तेथील निवडणुकीचा निकाल आधीच निश्चित करतात, त्यांचे कौतुक केले जाते ही विडंबना आहे. अमेरिकेची एकच पोटदुखी आहे ती म्हणजे बांगलादेशात झालेली लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक. देशात ९० टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही त्यांनी स्वतःला इस्लामी राष्ट्र जाहीर केलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.