Sherpas of Kashmir; ड्रग्सविरोधात जागरूकता करण्यासाठी स्काय मॅराथनचे आयोजन

अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जनजागृती करणे हा या मोहिमे मागील मुख्य हेतू होता.
Sherpas of Kashmir
Sherpas of Kashmir
Updated on
Summary

अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जनजागृती करणे हा या मोहिमे मागील मुख्य हेतू होता.

लशपथरी सोनमर्ग ते नारगन ग्रेट लेक्स ट्रेक या मार्गावरील स्काय मॅरेथॉन विक्रमी वेळेत पूर्ण करणारे खान आणि रैना हे जम्मू आणि काश्मीर येथील पहिले ट्रेकर्स ठरले आहेत. काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जनजागृती करणे हा या मोहिमे मागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खान आणि रैनाने लशपथरी सोनमर्ग ते नारगनपर्यंतचे 13000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेले हे अंतर 72 किमीचे केवळ 15.3 तासांत पूर्ण केलं आहे. या मॅरेथॉनसाठी एकूण धावण्याची वेळ फक्त 11.13 तास इतकी होती. ग्रेट लेक्स ट्रेक मार्गावर स्काय मॅरेथॉन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याबाबत बोलताना खान म्हणाले की, आम्ही आमची मॅरेथॉन 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता ती पूर्ण केली. धावत असताना आम्ही एकूण 84, 082 पायऱ्यांसह 11 वाजून 13 मिनिटांनी ही मॅरोथॉन पूर्ण केली आहे. आम्ही पहिली स्काय मॅरेथॉन विक्रमी वेळेत पूर्ण केल्याने आमचे स्वप्न सत्यात उतरले होते, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

Sherpas of Kashmir
Health News : ब्रेन डेड संदर्भात तुमच्याही मनात प्रश्न आहेत का? मग ही बातमी वाचाच..

काश्मीरच्या ग्रेट लेक्सवर ट्रेक पूर्ण करण्यासाठी ट्रेकर्सना 6 ते 7 दिवस लागतात. 'काश्मीरचे शेर्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोघांनी सांगितले की, या खोऱ्यात स्काय मॅरेथॉन सुरू करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

ते दोघे सांगतात की, आम्ही गेली सात वर्षे ट्रेकिंग करत आहोत. त्यामुळे आमच्या तरुणांना ट्रेकिंग, विशेषतः युरोपियन देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्काय मॅरेथॉनसाठी प्रेरित करण्यासाठी हा प्रवास सुरू केला. आपल्या तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करणे हा दुसरा हेतू होता, असंही त्यांनी सांगितलं.

रैना म्हणाला की, कमीत कमी वेळेत मिशन पूर्ण करण्यासाठी त्याने हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांचा सामना केला. आम्हाला सामान्य ट्रेक निवडावा लागला आणि वेळेचे बंधनही होते. प्रवास थकवणारा होता पण आम्ही तो विक्रमी वेळेत पूर्ण केल्यानंतर हा आनंद समाधान देणारा होता.

Sherpas of Kashmir
Health : कॅल्शियमची कमतरता दूर करायचीये? मग दूधाऐवजी 'हे' घटक वापरा, हेल्दी राहा

भारतातील लोकप्रिय ट्रेंड बनवण्यासाठी तो खोऱ्यातील इतर शिखरांवर मॅरेथॉनचे आयोजन करणार आहे असंही रैनाने सांगितले. आम्ही आकाश (स्काय) मॅरेथॉन चालू ठेवू आणि सूर्यास्त शिखरासह पर्वत मोजू. आम्हाला आशा आहे की आमची मोहीम पुढील काही वर्षांमध्ये इतर तरुणांनाही असाच प्रवास करण्यास प्रेरित करेल. खान आणि रैना दोघेही माउंटन गाईड म्हणून क्लिफहँगर्स इंडियाशी संबंधित आहेत. ग्रेट लेक्स ट्रेकिंग मोहिमेचे संचालन करणाऱ्या क्लिफहॅंगर्स इंडियाने या दोघांसाठी सर्व व्यवस्था केली.

क्लिफहॅंगर्स इंडियाचे संस्थापक मोहम्मद आरिफ म्हणतात की, काश्मीरमधील हा पहिला स्काय मॅरेथॉनचा ​​प्रयत्न होता. त्याला क्लिफहँगर्स इंडियाने पाठिंबा दिला आणि ही मोहीम सुरू करण्यापूर्वी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. आम्हाला आशा आहे की, स्काय मॅरेथॉन काश्मीरमध्ये लोकप्रिय होईल आणि अधिक तरुणांचा याकडे कल वाढेल.

Sherpas of Kashmir
Diabetes : टाइप 2 मधुमेहासाठी कारणीभूत घटक? कोणते उपाय कराल, जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.