Karnataka Election : शिकारीपुरातून ठरणार येडियुराप्पांचा वारसदार!

येडियुराप्पांनी निवडणुकीपासून दूर राहणार, तरी पुत्र विजयेंद्र शिकारीपूरमधून निवडणूक लढविणार
karnataka election
karnataka electionsakal
Updated on

शिकारीपूर मतदारसंघाने राज्याला चारवेळा मुख्यमंत्री दिला. २००७, २००८, २०१८ आणि २०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिकारीपूर मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे. याच मतदारसंघातून भावी मुख्यमंत्री उदयास येणार का? हे पहावे लागेल.

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा १९८३ पासून नऊ विधानसभा निवडणुकीपैकी आठ निवडणुकीत ते शिकारीपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दक्षिण भारतात प्रथमच कर्नाटकात भाजपला सत्ता मिळून देण्याचे श्रेय येडियुराप्पा यांनाच जाते. लिंगायत समाजातील या प्रभावी नेत्यांमुळेच लिंगायत समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला, परिणामी भाजपला कर्नाटकात सत्ता मिळविणे शक्य झाले.

karnataka election
Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस जिंकणार एवढ्या जागा; डीके शिवकुमार यांनी सांगितला आकडा

मध्यंतरी भाजप हायकमांडशी झालेल्या मतभेदातून येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कर्नाटक जनता पक्ष (केजीपी) स्थापन केला आणि विधानसभा निवडणुका लढविल्या. या वेळी भाजपच्या मतांची विभागणी होऊन २०१३ मध्ये भाजपला राज्यात सत्ता गमवावी लागली.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप हायकमांडला येडियुराप्पा यांच्याशी जुळवून घेणे भाग पडले आणि भाजपने त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या. या निवडणुकीत १०५ जागांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. परंतु काँग्रेस - धजद युती झाल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.

येडियुराप्पांच्या ‘ऑपरेशन कमळ’मुळे काँग्रेस, धजदच्या १७ आमदारांनी पदाचे राजीनामे दिले आणि युती सरकार कोसळले. येडियुराप्पांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आले. वयाच्या कारणावरून वर्षभरातच त्यांना २०१९ मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. येडियुराप्पा आणि लिंगायत समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नाही, याची जाणीव भाजप हायकमांडला आहे.

त्यामुळेच येडियुराप्पांची भाजपच्या संसदीय मंडळावर नियुक्ती करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ८० वर्षांच्या या प्रभावशाली नेत्याने आता निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र पुत्र व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना राजकीय वारसदार म्हणून ते पुढे करीत आहेत. शिकारीपूरमधून विजेंद्रच निवडणूक लढवतील असे त्यांनी जाहीर केले आहे.

karnataka election
Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 भाजप, एक JDS बंडखोरांसह 42 उमेदवारांना दिलं तिकीट

निवडणुकीचा इतिहास

२००८ च्या निवडणुकीत भाजपने ४५ हजार ९२७ मतांच्या फरकाने (३६.४३ टक्के) ६६.२२ टक्के मते मिळवून ही जागा जिंकली. २००८ च्या निवडणुकीत या जागेवर ८१.४५ टक्के मतदान झाले होते. २०१३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केजीपीने ही जागा २४ हजार ४२५ मतांच्या फरकाने (१७.६३ टक्के) जिंकून एकूण मतदानाच्या ४९.८९ टक्के मते मिळवली.

२०१३ मध्ये या जागेसाठी ८०.२४ टक्के मतदान झाले. २०१८ मध्ये, शिकारीपूर मतदारसंघात एकूण एक लाख ८८ हजार २६६ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या एक लाख ५४ हजार ८८३ होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा या जागेवरून विजयी झाले आणि ते आमदार झाले. त्यांना एकूण ८६ हजार ९८३ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार गोनी मलतेशा एकूण ५१ हजार ५८६ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा ३५ हजार ३९७ मतांनी पराभव झाला.

शिकारीपूर हा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पांचा बालेकिल्ला. येडियुराप्पांनी निवडणुकीपासून दूर राहणार असल्याची घोषणा केली असली, तरी पुत्र विजयेंद्र शिकारीपूरमधून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने उमेदवारी जाहीर केली नसली तरी विजयेंद्र हेच येथून येडियुराप्पांचे वारसदार असतील.

- बी. बी. देसाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.