Lok Sabha : शिंदे, पवार गटाला स्थान नाही

संसदेत लोकसभेच्या कामकाजासाठी अध्यक्षांकडून नेमल्या जाणाऱ्या कामकाजविषयक सर्वपक्षीय समितीमध्ये सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष कॉँग्रेस, द्रमुक, तेलुगू देसम, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह महाराष्ट्रातील केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
Lok Sabha
Lok Sabhasakal
Updated on

नवी दिल्ली : संसदेत लोकसभेच्या कामकाजासाठी अध्यक्षांकडून नेमल्या जाणाऱ्या कामकाजविषयक सर्वपक्षीय समितीमध्ये सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष कॉँग्रेस, द्रमुक, तेलुगू देसम, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह महाराष्ट्रातील केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. सत्ताधारी एनडीएचा प्रमुख घटक असलेल्या शिवसेना या पक्षाला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला समितीमध्ये स्थान मिळालेले नाही.

लोकसभेच्या कामकाजासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियुक्त केली आहे.

समितीत या नेत्यांचा समावेश

या १४ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला असतील. या समितीत भाजपचे अनुराग ठाकूर, पी. पी. चौधरी, निशिकांत दुबे, संजय जयस्वाल, वैजयंत पांडा याशिवाय लवू श्रीकृष्ण देवरायालू (टीडीपी), गौरव गोगोई (काँग्रेस), दिलेश्वर कामत (जेडीयू), दयानिधी मारन (द्रमुक), अरविंद सावंत (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), के. सुरेश (काँग्रेस), लालजी वर्मा (सप) सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल), या सदस्यांचा समावेश केला आहे. अधिवेशन काळात सभागृहासमोर येणाऱ्या विषयांचा प्राधान्यक्रम व त्यासाठीचा वेळ यावर समितीच्या बैठकीत सहमतीने निर्णय केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com