बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी एका विशेष मुलाखतीत, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष किती जागा जिंकेल याची माहिती दिली. शिवकुमार म्हणाले की, 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 141 जागा जिंकेल.
कर्नाटकात 224 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला ११३ पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. आगामी निवडणुका त्यांच्यासाठी "मेक ऑर ब्रेक" आहेत का असे विचारले असता, शिवकुमार म्हणाले, "मी तोडणार नाही, मी बनवणार आहे. तसेच कर्नाटकात काँग्रेस बहुमताने सत्तेवर येईल, असही त्यांनी ठामपणे सांगितलं.
त्रिशंकू निवडणुकीच्या बाबतीत जेडी(एस) सोबत हातमिळवणी करण्याची शक्यताही त्यांनी नाकारली. तसेच तशी परिस्थिती उद्भवणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं. कर्नाटक काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यासह, पक्षाने आतापर्यंत 166 उमेदवार जाहीर केले आहेत. डीके शिवकुमार म्हणाले की, जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये संपूर्ण पक्ष एकवटला आहे.
आपण पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वत: ला सादर करणार का असे विचारले असता, ते म्हणाले की याचा अंतिम निर्णय पक्ष हायकमांड घेईल. तथापि, आपल्याला संधी दिली तर आपण त्या संधीचं सोनं करू. मात्र प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगली पाहिजे असही त्यांनी म्हटलं.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होणार असून निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहेत. डीके शिवकुमार कनकापुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.