'५६ इंचाची छाती', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत तुलना करत सेनेचा PM मोदींना टोला

shivsena pm modi comparison with ukraine president Volodymyr Zelenskyy
shivsena pm modi comparison with ukraine president Volodymyr Zelenskyy e sakal
Updated on

युक्रेन-रशियामध्ये सलग पाचव्या दिवशीही युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनकडे खूपच कमी सैन्यबळ आहे. तरीही युक्रेन त्यांचा सामना करत आहे. त्यामुळे जगभरातून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Russia President Volodymyr Zelenskyy) यांचं कौतुक होत आहे. त्यावरूनच आता शिवसेनेने झेलेन्स्कीसोबत पंतप्रधान मोदींची (PM Modi) तुलना केली असून केंद्र सरकारच्या युद्धाबद्दलच्या तटस्थ भूमिकेवर देखील टीका केली आहे.

shivsena pm modi comparison with ukraine president Volodymyr Zelenskyy
Russia-Ukraine War: युक्रेनच्या मुद्द्यावर PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

''रशिया युक्रेनवर चहूबाजूंनी हल्ले करत आहे. पण, झेलेन्स्की यांनी देशाला वाचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तब्बल ६७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना फोन करून मदत मागितली. त्यामध्ये आपले पंतप्रधान मोदी देखील होते. पण, एकही राष्ट्र युक्रेनला उघडपणे मदत करायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन देखील फुसकेच निघाले. त्यांनी युक्रेनला सैन्य आणि दारूगोळा पाठवायला हवा होता. पण, त्यांनी उलट झेलेन्स्की यांना यु्क्रेन सोडण्याचा सल्ला दिला. पण, झेलेन्स्की एखाद्या महानायकाप्रमाणे रणांगणात उतरून लढत आहेत. यालाच ५६ इंचाची छाती म्हणातात'', असं म्हणत पंतप्रधान मोदींना शिवसेनेने सामना अग्रलेखातून टोला लगावला आहे.

युक्रेन-रशिया युद्धात भारतानं दोन्ही देशांची बाजू न घेता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यावरून देखील शिवसेनेने टीका केली आहे. भाजपचे आजचे पुढारी तटस्थ भूमिकेबद्दल पंडित नेहरूंना दोष द्यायचे आज त्यांनीच अशी तटस्थ भूमिका स्वीकारला आहे. त्याच भाजप पुढाऱ्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावरून बसून फापडा खाणे पसंत केले आहे, असं म्हणत परत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

झेलेन्स्की यांचं कौतुक -

झेलेन्स्की आज जगाचे नायक बनले आहेत. अमेरिका, चीनसारख्या महासत्ता भूमिका घ्यायला तयार नाहीत. रशियाचे पुतीन लांडग्याप्रमाणे युक्रेनचे लचके तोडत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय मंच हे मेंढरासारखे खाली मान घालून उभे आहेत. झेलेन्स्की हे त्यांच्या परिवाराहसह पळून जाऊ शकले असते. पण, त्यांनी नकार दिला. ते स्वतः रणांगणात उतरले, अशा शब्दात झेलेन्स्की यांचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.