नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा सक्तवसुली संचलानालयाने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. काल दिवसभर त्यांची ईडीच्या तब्बल १० अधिकाऱ्यांकडून चौकशी चालू होती. त्यांच्या अटकेनंतर राज्यसभेच्या सभागृहातही पडसाद उमटू लागले आहेत. राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून भाजपवर ताशेरे ओढले जात आहेत. त्याचबरोबर शिवसेना खासदारही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काही वेळासाठी राज्यसभेचे आणि लाकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
(MP Sanjay Raut Arrested By ED)
राज्यसभेचे आणि लोकसभेचे एकत्रित पावसाळी अधिवेशन चालू असतानाच खासदार संजय राऊतांना अटक झाल्यामुळे शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेतील कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत असून सगळे सत्ताधारी धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, काल पहाटेच खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. ईडीचे तब्बल १० अधिकारी आणि काही कर्मचारी राऊतांच्या घरात दिवसभर तळ ठोकून होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर अखेर नऊ तासांच्या सखोल चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री उशीरा त्यांना अटक केली आहे. त्यानंतर भाजपवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली असून याचे पडसाद राज्यसभेतही दिसून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.