नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena MP vinayak raut) यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union minister Nitin Gadkari) यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोकणातील प्रलंबित रस्ते आणि मुंबई-गोवा महामार्गासंबंधित चर्चा करण्यात आली. ''मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान'', असे विनायक राऊत म्हणाले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या रखडलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी विनंती खासदार राऊतांनी नितीन गडकरींना केली. तसेच कोकणातील संगमेश्वर-लांजा या रस्याचे काम रखडले आहे. म्हैसकरांच्या कंपनीने हे काम केलेलेच नाही. त्यामुळे चांगले कंत्राटदार नेमावे आणि कंत्राटदार म्हैसकरांकडे ठेकदारांची ५८ कोटींची थकबाकी आहे, ती देण्यात यावी, अशी मागणी देखील विनायक राऊत यांनी नितीन गडकरींकडे केली.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील महत्वपूर्ण प्रकल्प चिपी विमानतळ सुरू झाला आहे. ही विमानसेवा चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे. आता फक्त कुडाळ ते एअरपोर्ट मार्गे देखील लवकर पूर्ण करावा, असेही विनायक राऊत गडकरींना म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांनी देखील आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांबाबत गडकरींची भेट घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच परळीला दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभारही मानले. या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.