नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरून आता संसदेच्या १२ खासदारांचे निलंबन (12 MP Suspended) करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) यांचा देखील समावेश आहे. संसदेतून निलंबन झाल्यानंतर त्यांनी संसद टीव्हीच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
प्रियंका चतुर्वेदी संसद टीव्हीवरील ''मेरी कहानी'' या कार्यक्रमाचे अँकरींग करत होत्या. या कार्यक्रमासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मला अजूनही तो कार्यक्रम आवडतो. मात्र, संसदेतील १२ खासदारांचे मनमानीपणे निलंबन केले आहे. आम्हाला संसदीय कर्तव्य पार पाडण्यासाठी संसदेत जागा नाकारली जात आहे. त्यामुळे आता संसद टीव्हीचा राजीनामा देत आहे, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्यसभेच्या २५४ व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच ११ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी झालेल्या मान्सून अधिवेशनावेळी सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल अशी वर्तवणूक केलीय. त्यामुळेच राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणुकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आल्याचं सांगितलं होतं. यामध्ये काँग्रेसचे पाच, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. पण, ही कारवाई नियमबाह्य असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यासाठी या खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर निदर्शने देखील करत आहेत. त्यांचे निलंबन मागे घेईपर्यंत दररोज आंदोलन करत राहण्याचा निर्णय या खासदारांनी घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.